मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-21-माझा आवडता छंद चित्रकला

Started by Atul Kaviraje, November 03, 2022, 09:06:38 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               "मला आवडलेला निबंध"
                                   निबंध क्रमांक-21
                              ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता छंद चित्रकला"

     छंद ही एक अशी क्रिया आहे जी आनंद मिळवण्यासाठी केली जाते. जेव्हा आपण रोजचे कामे करून मोकळे होतो तेव्हा आनंदासाठी काहीतरी केले जाते यालाच छंद म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीचा छंद वेगवेगळा असतो. काहींना खेळायला आवडते काही लोकांचा छंद पुस्तक वाचन असतो तर काहींना दुर्मिळ वस्तू गोळा करायला आवडते.

     माझा आवडता छंद चित्रकला (Drawing) आहे. मला वेगवेगळे रंग वापरून चित्र काढणे आवडते. चित्रकला मला आनंद देते. माझा आवडता वेळ तो असतो जेव्हा मी शाळेतून घरी येतो कारण याच वेळात मी माझा छंद चित्रकला करतो. मला जेव्हा ही रिकामा वेळ असतो मी चित्र काढतो.

     मी माझ्या वहीत माझ्या आई वडिलांचे एक चित्र काढले आहे. ते चित्र माझे आवडते चित्र आहे. या शिवाय मला फळे जसे आंबा, संत्री आणि केळी चे चित्र काढायला आवडतात. माझी आई मला जास्तीत जास्त चित्र काढायला प्रोत्साहन देते. माझ्या शाळेत देखील प्रत्येकाला माझे चित्र आवडते. जेव्हा केव्हा शाळेत चित्रकला स्पर्धा असते. तेव्हा मला त्यात सहभाग घ्यायला सांगितले जाते. मी पण मोठ्या आनंदाने चित्रकला स्पर्धेत भाग घेतो. माझ्या वडिलांनी मला घरात एक लहान खोली चित्रकला करण्यासाठी करून दिली आहे. त्या खोलीत मी माझे सर्व चित्र ठेवले आहेत.

     चित्रकले साठी लागणारे सर्व साहित्य माझे आई वडील मला आणून देतात. त्यांनी मला चित्र काढण्यासाठी कधीही नाही म्हटले नाही उलट ते माझे चित्र पाहून आनंदित होतात. भविष्यात मी एक चित्रकार बनेल व छान छान संदेश लपलेली चित्रे काढत जाईल.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.11.2022-गुरुवार.