अरुण दाते-या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

Started by Atul Kaviraje, November 05, 2022, 09:26:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, श्री अरुण दाते यांनी गायिलेले एक गीत. या गीताचे शीर्षक आहे- "या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे"

                       "या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे"
                      ----------------------------------------

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे
चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ?
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते
नदिच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

या ओठांनी चुंबुनि घेइन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

============
गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : यशवंत देव
स्वर : अरुण दाते
============

--प्रकाशक : शंतनू देव
--------------------

                 (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                            (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
                -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.11.2022-शनिवार.