अरुण दाते-डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी

Started by Atul Kaviraje, November 06, 2022, 10:20:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, श्री अरुण दाते यांनी गायिलेले एक गीत. या गीताचे शीर्षक आहे- "डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी"

                          "डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी"
                         ----------------------------------

डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी

कामांत गुंतलेले असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी

वाटेवरी खुणेच्या शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी

सौदा इथे सुखाचा पटवून चोख घ्यावा
व्यवहार सांगती हा, ही माणसे शहाणी

कळणार हाय नाही दुनिया तुला मला ही
मी पापण्यांत माझ्या ही झाकिली विराणी

============
गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : यशवंत देव
स्वर : अरुण दाते
============

--प्रकाशक : शंतनू देव
---------------------

                 (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                            (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
                -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.11.2022-रविवार.