मला आवडलेला लेख-क्रमांक-१-आत्मा आणि मानवी मेंदू-ब

Started by Atul Kaviraje, November 08, 2022, 09:45:39 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               "मला आवडलेला लेख"
                                   लेख क्रमांक-१
                              ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "आत्मा आणि मानवी मेंदू"

                                आत्मा आणि मानवी मेंदू--
                                ---------------------

     अशी प्रश्नोत्तरे उद्भवण्याचे कारण म्हणजे मेंदूच्या कार्याविषयीं असलेली त्या काळच्या माणसाची अनभिज्ञता.अन्य सर्व इंद्रियांची कामे कोणती ते स्पष्टपणे कळत होते.पण डोक्याच्या कवटीत आहे ते काय? त्याचे कार्य कोणते? याची काहीच कल्पना नव्हती.ज्यात शंभर अब्ज मज्जा पेशी आहेत असा माणसाचा मेंदू म्हणजे जगातले सर्वांत विस्मयकारक ,गहनतम असे विद्युत् -रासायनिक यंत्र आहे. माणसाच्या शारीरिक,वैचारिक,मानसिक,भावनिक अशा सर्व कृतींचे नियंत्रण मेंदू करतो हे गेल्या शंभर- दिडशे वर्षांत समजले आहे.उपनिषद् काळात मेंदू विषयीचे हे ज्ञान नसणे स्वाभाविक आहे.

     पण माणसाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याला हवी असतातच.शिष्यांनी विचारलेल्या अशा प्रश्नांवर गुरू चिंतन करतात.इंद्रिये आपापली कामे करतात त्यासाठी त्यांना कोण प्रवृत्त करतो?कोण आज्ञा देतो?इंद्रिये,मन,बुद्धी यांच्यावर नियंत्रण ठेवणारा कोणीतरी शरीरात असला पाहिजे असे त्यांना वाटते होते.यावर विचार करतां त्या ऋषींना विश्वनिर्मितीच्या ब्रह्मसिद्धान्ताचे स्मरण झाले.सर्वव्यापी ब्रह्मापासून विश्वाची निर्मिती झाली हे सर्व उपनिषदकार मानत होते.त्या ब्रह्माचा अंश माणसाच्या शरीरात असणार हे तर्कसंगत वाटले.म्हणून त्यांनी तशी कल्पना केली.शरीरांतील त्या मानीव ब्रह्मांशाला आत्मा असे नाव दिले.सर्वव्यापी ब्रह्म आणि शरीरस्थ ब्रह्म यांतील भेद स्पष्ट होण्याकरिता सर्वव्यापीसाठी परब्रह्म,परमात्मा,परमपुरुष,शिवात्मा तर शरीरस्थासाठी ब्रह्म,आत्मा,जीवात्मा,अंतरात्मा,देही असे शब्द रूढ झाले.हा आत्मा हृदयात असतो हेही सर्वमान्य झाले."अंगुष्ठमात्रो पुरुषोSन्तरात्मा सदा जनानं हृदये संनिविष्ट:।,सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्त: स्मृतिर्ज्ञानमपोहनंच।[मी सर्वांच्या हृदयात सामावलो आहे.स्मृती,ज्ञान,चिकित्सक वृत्ती यांचा उद्भव माझ्यातून आहे.] असे उल्लेख उपनिषदांत तसेच गीतेत आहेत.इथे हृदय हे स्थान सोडून अन्य सर्व गोष्टी मेंदूला लागू पडतात हे आपण आज जाणतो.

     पुढे या काल्पनिक आत्म्याच्या पायावर पुनर्जन्म,संचित,प्रारब्ध,स्वर्ग,मोक्ष,मोक्षप्राप्तीचे विविध मार्ग ,जन्ममृत्यूचे फेरे,चौर्‍याऐशी लक्ष योनी अशा अनेकानेक संकल्पनांचे बहुमजली डोलारे उभे राहिले.वस्तुत: हे सगळे माणसाच्या मेंदूनेच निर्माण केले."तुम्ही ज्याला शोधत आहात तो कर्ता-करविता मी आहे." याचा थांगपत्ता त्याने दीर्घकाळ लागू दिला नाही. त्याच्या आज्ञेनेच तर सगळे घडत होते पण ते त्याचे त्यालाच ठाऊक नव्हते मग थांगपत्ता कोण, कोणाला कसा सांगणार?

     अशी आहे ही जाणिवेची जाणीव असलेल्या (पण बरेचदा कुठल्या कुठे भरकटणार्‍या ) होमो सेपियन सेपियनची गंम्मत ! म्हणजे अब्जावधी मज्जापेशींनी बनलेल्या त्याच्या मेंदूची मज्जा !

--AUTHOR UNKNOWN
-------------------------
(August 10, 2013)
---------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.11.2022-मंगळवार.