कुणाचा

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, November 12, 2022, 09:32:02 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

नव्हता मूळात हा व्यापार कुणाचा
तेच बोलले केला विस्तार कुणाचा

हलकट दुनियेच ऐकून वागलो मी
दुरून बोलती केला शृंगार कुणाचा

कपटी वागलो मी नात्यात आपल्या
कळले नंतर तूटला संसार कुणाचा

चूक झाली विश्वास ठेवून जगावर
या दुःखी रस्त्यावर विचार कुणाचा

जगावे म्हणतो आहे पुन्हा नव्याने
मुखी घेणार नाही उच्चार कुणाचा

माफ करा हो शेवटची देऊन संधी
नाही मला शेवटी आधार कुणाचा

कविराज....अमोल.....
मो.७८२८८९५५५५...अहमदनगर