II श्री गणेशाय नमः II-श्री गणेश संकष्टी चतुर्थी-संकष्टी चतुर्थी शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, November 12, 2022, 09:12:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II श्री गणेशाय नमः II
                                 "श्री गणेश संकष्टी चतुर्थी"
                                -----------------------
                                             
मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक-12.11.2022-शनिवार, संकष्टी चतुर्थीचा पावन दिन आहे . श्री गणेश चरणी वंदन करून, ऐकुया गणेश चतुर्थीच्या हार्दिक  शुभेच्छा--

                संकष्टी चतुर्थी शुभेच्छा--

     मराठी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शोध घेत असाल तर मराठीत संकष्टी चतुर्थी शुभेच्छा साठी हे योग्य स्थान आहे. खाली तुम्हाला चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत.

     काही ठिकाणी असे मानले जाते की या उपवासातील वैभवामुळे जन्म घेणाऱ्या मुलाला सुख मिळते. या दिवशी गणेशाला दुर्वा अर्पण केली जाते. दुर्वा हे अमृतांचे निवासस्थान मानले जाते.

     संकष्टी चतुर्थी या दिवशी श्री. गणेशाची पूजा केली जाते. असे म्हंटले जाते कि या व्रताचे पालन केल्यास व्यक्तीचा सर्व त्रास नष्ट होतो आणि या उपवासातील वैभवामुळे आई ला होणारे जे मुल आहे त्याला आनंद मिळतो. या दिवशी गणेशाला दुर्वा अर्पण केला जातो. दुर्वा हे अमृतांचे निवासस्थान मानले जाते. गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने आरोग्याला सुद्धा फायदा होतो आणि सर्व पापांचा अंत होतो. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

आज संकष्टी चतुर्थी आहे!
आजच्या या शुभ मंगल दिनी
माझ्या सर्व गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छा, आशा, मनोकामना
श्री गणेश पूर्ण करतील..
हीच महा गणरायाला चरणी प्रार्थना...
--सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

माझ्या सर्व मित्रांना संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...
तुमच्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण होतील,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, लाभेल,
हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो
--संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होवोत,
घरात सुख-समृद्धी, ऐश्वर्य, नांदो
हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना

वंदन करतो गणपती राया तुम्हाला,
हात जोडतो माझ्या गणपती विनायकाला..
प्रार्थना करतो माझ्या गजाननाला,
सर्वांना सुखी ठेव नेहमी माझ्या सर्वाना..!
--संकष्टी चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा !

श्री गणेशाच्या माझ्या सर्व प्रिय भक्तांना
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

--शुभम पवार
-------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी कॉर्नर.कॉम)
                    -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.11.2022-शनिवार.