कागदावर माझी लेखणी अश्रुत ओली झाली

Started by तुतेश रिंगे ✍️, November 16, 2022, 02:51:34 AM

Previous topic - Next topic

तुतेश रिंगे ✍️



तु गेल्यावर रडायला पावसाने साथ दिली
कागदावर माझी लेखणी अश्रुत ओली झाली

तुझ्या विरहात लेखणीशी माझी जवळीक वाढली
तुझ्या आठवणीत मी तुझ्यावर कविता लिहली

कविता ही तुझ्यासारखीच झाली
जशी अर्ध्यावर तु माझी साथ सोडली

तशी कविता माझी अपूर्ण राहिली
माझ्या समोर शब्दांची फसगत झाली

Insta id  @tuteshringe ✍️
:- तुतेश रिंगे ✍️
__________________________________
Follow me on instagram
shabd_mazya_manatale__