तुला पाहुन मन गेले वाहुन

Started by Kavyadhara, November 18, 2022, 10:55:13 AM

Previous topic - Next topic

Kavyadhara

ला ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला ला ला

मी एक नौका तु एक लहर
तु येते उसळून मी घेतो जुळवून
तुला ओढ किनार्याची तु वाहते फिरून
मला लुभावतो तो टापू खुणावून
तुला पाहुन मन गेले वाहुन
तुझी प्रित प्रिय होते राहुन राहुन

वेग चलनाचा आस मिलनाची
त्यात धुंध घुसळलेली गमनाची
तु खळ खळून येतेस भुलून
मी माञ जातो तुझ्यामध्ये भिजून
तुला पाहुन मन गेले वाहुन
तुझी प्रित प्रिय होते राहुन राहुन

बहरून तरूण दिसतो शानदार
प्रिये तुझा हा तौर डौलदार
मी ठप्प होतो तु येता निखळून
तुला पाहुन मन गेले वाहुन
तुझी प्रित प्रिय होते राहुन राहुन