मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-11

Started by Atul Kaviraje, November 18, 2022, 09:12:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-11
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "आस्तिक/नास्तिक"

                                आस्तिक/नास्तिक--
                               ----------------

     A philosopher: "All those who generalize are fools"
His friend: "You are one of them, as your statement itself is a generalization."

     नुकत्याच प्रसिध्द झालेल्या Global Index of Religion and Atheism (Win/Gallup International, 2013) सर्वेमधे काही आश्चर्यकारक आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. जगातील ५९% लोक स्वत:ला धार्मिक/आस्तिक म्हणवतात तर २३% लोक अधार्मिक असून १३% लोक पक्के नास्तिक आहेत. भारतातील धार्मिक लोकांचे प्रमाण २००५ साली ८७% होते ते २०१३ मधे ८१% आले व नास्तिक लोकांचे प्रमाण त्याच काळात ४% वरून ३% वर आले. म्हणजे धार्मिक/आस्तिक लोकांचे प्रमाण ६% व आस्तिक लोकांचे प्रमाण १% ने कमी झाले. सर्वात आश्चर्यकारक आकडा चीनचा आहे. सर्वेनुसार चीनमधील ४७% लोक नास्तिक आहेत.

     वरील सर्वच आकडेवारी अविश्वसनीय आहे. त्याचे कारण म्हणजे जगातील ७०० कोटी लोकसंखेपैकी केवळ ५१९२७ लोकांना प्रश्नविचारून केलेले हे परीक्षण आहे. ५७ देशातील सरासरी १००० लोकांच्या उत्तरावर आधारित असलेले हे परीक्षण कोणत्याही शास्त्रशुध्द पद्धतीत बसणारे नाही. भारतातील १२० कोटी लोकसंखेपैकी केवळ १००० लोकांना प्रश्न विचारून काढलेला निष्कर्ष सर्व भारताला लागू करणे गैर आहे. चीन मधील निम्मी लोकसंख्या नास्तिकांची आहे यावर कोण विश्वास ठेवेल? भारतात दर दहावार्षाने जनगणना होते. त्यात लोकांच्या धर्माबद्धल माहिती विचारली जाते. जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारतात ०.१% लोक अधार्मिक आहेत. स्वत:ला उघडपणे पक्के नास्तिक म्हणवणारे लोक तर हाताच्या बोटावर मोजावे लागतील. भारतात जवळजवळ २०% लोक अधार्मिक आहेत व त्यातील ३% लोक पक्के नास्तिक आहेत यावर विश्वास बसतो का ?

--AUTHOR UNKNOWN
-------------------------
(May 28, 2013)
------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.11.2022-शुक्रवार.