मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-37-माझा आवडता विषय गणित

Started by Atul Kaviraje, November 19, 2022, 09:32:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-37
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता विषय गणित"

     तसे पाहता शाळा कॉलेज मध्ये अनेक वेगवेगळे विषय शिकवले जातात. परंतु काही विद्यार्थ्याना एखादा विषय अधिकच आवडतो. मला शाळेत असतांना गणित विषय खूप आवडायचा व माझा आवडत विषय गणित होता. म्हणून आजच्या या लेखात आपण Maza avadta vishay Essay nibandh पाहणार आहोत. तर चला सुरू करू...

     मला लहानपणी पहिल्या इयत्तेत जेव्हा गणित शिकवले तेव्हापासूनच मी गणिताचा प्रशंसक आहे. माझ्या शिक्षकांनी मला 1 ते 10 पर्यंत अंक वाचन शिकवले होते. नंतर माझ्या आईच्या मदतीने मी 50 पर्यंतचे अंक शिकले. मी या विषयाबद्दल अधिक शिकण्यासाठी उत्सुक होतो. गणित शिकण्यात माझ्या आईने मला खूप मदत केली. तिने स्वयंपाक घरातील वस्तू जसे चम्मच, संत्री, फळे इत्यादी मोजून माझा गणिताचा पाया भक्कम केला.

     गणितात असलेली माझी आवड पाहून माझी आईने लवकरच मला अबॅकस क्लास लावून दिला या क्लास मुळे तर माझे गणित अधिकच मजबूत झाले. जेव्हा माझे वडील मला खेळणे घ्यायला घेऊन गेले तेव्हा मी त्यांच्या कडून अबॅकस मागितले. अबॅकस ही गणित शिकण्याची प्राचीन पद्धत आहे.

     या नंतर शाळेत होणाऱ्या विविध गणित स्पर्धेत मी सहभाग घेऊ लागलो. इयत्ता चौथीत असताना मी स्कॉलरशिप ची परीक्षा दिली व गणिती विषयात मला 100 पैकी 92 मार्क प्राप्त झाले. मला शासनाकडून शिक्षणासाठी मोफत स्कॉलरशिप मिळाली. जेव्हा पण मला अभ्यास करायला सांगितले जायचे. तेव्हा मी गणित चे पुस्तक उघडून उदाहरणे सोडवत बसायचो. परंतु गणितात असलेल्या आवडमुळे हळू हळू इतर विषयांकडे माझे दुर्लक्ष व्हायला लागलं. जेव्हा इयत्ता 5 वी चा निकाल लागला तेव्हा मला गणितात पैकी च्या पैकी मार्क होते. परंतु इतर विषयात मला खूप कमी कमी मार्क मिळाले. विज्ञान विषयात तर मी काठावर पास झालो. घरी आल्यावर माझ्या वडिलांनी मला व्यवस्थित समजाऊन सांगितले की मी सर्व विषयांकडे समान लक्ष द्यायला हवे.

     या नंतर मी पण सर्व विषयांचा मन लाऊन सारखाच अभ्यास करू लागलो. हळू हळू मला गणिता शिवाय इतर विषयांमध्येही आवड निर्माण झाली. व यांच्या पुढच्याच वर्षी सहामाई परीक्षेत मी सर्व विषयांमध्ये चांगले मार्क मिळवून उत्तीर्ण झालो व आत मी वर्गातील तसेच आमच्या शेजारी असणाऱ्या इतर मुलांना गणित विषयात येत असलेल्या अडचणी सोडवण्यात मदत करतो. भविष्यात मोठे झाल्यावर मला एक गणित तज्ञ बनण्याची इच्छा आहे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.11.2022-शनिवार.