मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-12-कर्ज काढून तूप प्या

Started by Atul Kaviraje, November 19, 2022, 09:41:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला लेख"
                                   लेख क्रमांक-12
                               ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "कर्ज काढून तूप प्या"

                                  कर्ज काढून तूप प्या--
                                 ------------------

यावज्जीवेत सुखज्जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः II

     नास्तिक शिरोमणी चार्वाक ही एक व्यक्ती होती कि एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या जीवनवाही तत्त्वज्ञानाचे ते नाव होते या बाबत वाद असला तरी लोकायत तत्वज्ञानाची बाजू जे घेतात त्यांना सर्वसाधारण चार्वाक म्हणून ओळखले जाते. चार्वाक मंडळींचा यज्ञ याग होम हवन इत्यादींना विरोध असल्याने त्यांना असुर म्हटले जात असे. चार्वाक मंडळी इहवादी तर अध्यात्मिक मंडळी परलोकवादी. एरवी अतिशय आक्रमक असणारी चार्वाक मंडळी मात्र "कर्ज काढून तूप प्या" या त्यांच्या सुप्रसिद्ध वचनाचे बाबतीत मात्र संरक्षणात्मक पावित्रा घेतात.

     खरे पाहिले तर कर्ज घेण्यात काहीच गैर नाही. कर्ज घेणे हा एक वित्तीय साधनसामग्री जमविण्याचा मार्ग आहे. कर हे वित्तीय हत्यार आहे. घेतलेल्या कर्जाचा योग्य वापर केला व ठरल्याप्रमाणे ते परत केले तर त्यात काहीच गैर नाही. जगातील सर्व बँकांचा व्यवहार ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे यावर चालतो.

     स्वतःला अध्यात्मवादी म्हणवणारे लोक सर्रास क्रेडीट कार्ड वापरत असतात, घरासाठी कर्ज घेतात, कर्ज घेवून मुलीच्या लग्नात मोठ्याप्रमाणावर खर्च करतात. चार्वाक मंडळीनी "कर्ज काढून तूप प्या" म्हटले तर कडाडून टीका करतात. या लोकांचा मुखवटा जरी आध्यात्माचा असला तरी चेहरा मात्र चार्वाकाचाच असतो.

--AUTHOR UNKNOWN
------------------------
(May 24, 2013)
-----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.11.2022-शनिवार.