मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-125

Started by Atul Kaviraje, November 20, 2022, 09:22:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                मला आवडलेल्या चारोळ्या
                                   चारोळी क्रमांक-125
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --संयम , संयमितपणा , आहे  तसेच  राहणे , न  बदलणे , कोणत्याही  परिस्थितीत  आपला  निश्चय  ढळू  न  देणे , आपले  वर्तन  न  बदलू  देणे , या  गुणधर्मासाठी , चारोळीकाराने  निसर्गाचे  एक  अतिशय  उत्तम  उदाहरण , दाखला  येथे  आपल्या  चारोळीतून  दिला  आहे . त्यासाठी , त्याने  पायवाटेचे, पाऊलवाटेचे   उदाहरण  दिले  आहे . तो  म्हणतोय , की  ही  पायवाट  वर्षानुवर्षे  आहे  तिथेच  असते . ती इथून  तिथे  कुठेही  हलत  नाही, जात नाही. निपचित  पडून  असते . त्यावरून  येणारे-जाणारे  पथिक , तिला  तुडवून  जात  असतात . ती  काहीही  म्हणत  नाही . ऋतूवIरIप्रमाणे  ती  कधीही  बदलत  नाही . आपला  स्वभाव  ती  कधीही  सोडत  नाही . तिला  उन्हाळा , हिवाळा , पावसाळा  हे  ऋतू  सर्व  सामान  असतात . पावसाळ्यात  सभोवताली  उगवणारी  हिरवळ , उन्हाळ्यातली  रखरख  तिला  सर्व  एकसमानच  वाटतात . तिला  हिरवळीचे  आणि  रुक्षपणाचे  काहीही  देणे-घेणे  नसते . अशी  ही  पायवाट  सर्वस्वी  भिन्न  अशी  असते . हिरवळ  सरली  की  पुन्हा  रखरख  तिच्या  नशिबी  वारंवार  येत  असते .  तिचे  प्राक्तन  कधीही  बदलत  नाही , ती  आहे  तशीच  राहते , एखाद्या  त्रयस्थासमान, तटस्थ अशी.

===============
हिरवळीवर धावणारी पायवाट,
किती अस्मितेने वागते.
हिरवळ ओसरली की,
निपचीत पडुन पुन्हा वाट पाहते.
===============

नवं-चारोळीकार
--------------

             (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझ्या लेखणीतून.ब्लॉगस्पॉट.कॉम)
            -------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.11.2022-रविवार.