मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-42-माझे आवडते कार्टून-छोटा भीम

Started by Atul Kaviraje, November 24, 2022, 08:56:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-42
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझे आवडते कार्टून-छोटा भीम"

     टीव्ही वर दिवसभरात अनेक कार्टून लागतात. पण माझे आवडते कार्टून पोगो वर लागणारे छोटा भीम चे कार्टून आहे. छोटा भीम हा ढोलकपुर नावाच्या एका गावात राहतो. व त्याला अतिशय चांगला आणि ताकदवान दाखवण्यात आले आहे. त्याला लाडू खायला खूप आवडते. त्यांच्या गावात टून टून नावाची एक मावशी राहते जी सर्वांना लाडू बनवून खाऊ घालते. टून टून मावशी ची मुलगी छुटकी, भीम, राजू व जग्गू माकड चांगले मित्र असतात.

     त्यांचे गाव ढोलकपुर चे राजा इंद्र वर्मा असतात इंद्रवर्मा च्या मुलीचे नाव इंदुमती आहे. छोटा भीम व त्याच्या मित्रांचे शत्रू कालिया आणि ढोलू भोलू आहेत. कालिया ला भीम ची शक्ती पाहून जलन होते. पण तरीही भीम त्याच्याशी प्रेमाने वागतो व त्याला अनेकदा संकटातून वाचवतो. या शिवाय भीम नेहमी शत्रूपासून ढोलकपुर चे रक्षण करतो डाकू, चुडेल, जादूगार इत्यादी शत्रूंना भीम एकटा हरवतो.

     भीम खूप बुद्धिमान व प्रेमळ आहे. तो नेहमी दुसऱ्यांची मदत करतो. या मुळेच तो ढोलकपुरचा राजा व ढोलकपुरमधील इतर लोकांना खूप आवडतो. भीम आपल्याला एका चांगला व्यक्ती बनण्यास प्रेरणा देतो. इतरांना मदत करण्याची शिकवण या कार्टून मधून मिळते. मी दररोज छोटा भीम पाहतो. छोटा भीम चे अनेक चित्रपट बनवण्यात आले आहे. काही चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित देखील झाले आहेत. मी छोटा भीम चे सर्व भाग पाहिले आहे. व आठवड्यातून दर रविवारी भीम चे दोन नवे भाग दाखवले जाते.

     मी जेव्हा छोटा भीम पाहत असतो तेव्हा माझे वडील चॅनल न बदलवता माझ्यासोबत कार्टून पाहू लागतात. त्यांनाही हे कार्टून पाहायला आवडते. परंतु मी जास्त वेळ टीव्ही न पाहता दररोज एक तास चा वेळ ठरवून तेवढाच वेळ छोटा भीम पाहतो. मला छोटा भीम चा आवाज खूप आवडतो व भविष्यात मी छोटा भीम च्या डबिंग आर्टिस्ट ला नक्कीच भेटेल.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.11.2022-गुरुवार.