’म’वाली....

Started by Vkulkarni, August 16, 2010, 03:01:29 PM

Previous topic - Next topic

Vkulkarni

बरेच दिवस शांत होतो. पण सद्ध्या मायबोली.कॊम वरील एक दिग्गज कवि कौतुकराव शिरोडकरांनी लावलेला धडाका बघून आम्हालाही सुरसुरी आली.
कौतुकरावांच्याच


या सुंदर कवितेला आमचे हे विडंबन सादर समर्पित.

'बाई' ने पुरावे खुले मांडलेले...
'साहेबां'शी दुरावे किती वाढलेले...,

पिपासू नेत्यांचे घसे कोरडे अन...
खंड भुखंडांचे वाया चाललेले ....,

वासना धनाची प्रभागास जाळी ....
चरे नित्य आमदार निधीस लाभलेले,

दिसे राजधानीची कवाडे मनाशी...
रडतात पुढारी, तिकीट कापलेले,

द्यावे..? घ्यावे..? कसे सिद्ध व्हावे..?
सारेच प्रश्न जनपथी टांगलेले...,

उठे हात दोन्ही, " कुणी होय वाली?"
मन – मोहन सोनिया चरणी गुंतलेले .... !(आता जुना झालेला) ईडंबनकार ईरसाल खोटे