माझी वरात होती....

Started by rupesh, August 16, 2010, 08:32:12 PM

Previous topic - Next topic

rupesh

माझी वरात होती...........
.
..
...
कधी वाटते स्वप्न प्रीतीची माझ्या उरात होती
कधी वाटते निस्वार्थ प्रीती तव नकारात होती

अनाकलनीय शब्द सुरातून रचलेली जी गीते
भाषा त्यांची सवाल-जवाबाच्या प्रकारात होती

मैफिलीमधे उपरे सारे आधार कुणाला मागू?
तुजला शोधत आर्जव गाणी माझ्या स्वरात होती

कशी अचानक देहांताची शिक्षा मनास झाली
नागदंशासम दाह-वेदना त्या प्रचारात होती

काजळबोट गालावरचे माझे मीच पुसले
सुरात सनई, सजली आज माझी वरात होती
(ओळीवरून सुचलेली)
(२३ नोव्हेंबर २००९ )

---प्रिया गवई

amoul