तुही बागडावे

Started by शिवाजी सांगळे, November 28, 2022, 02:42:18 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

तुही बागडावे

उगाच जीव कावरा बावरा होतो एकांती
पडसाद हळव्या हुंकाराचा होतो भोवती

दौडते नजर चौफेर शोधण्या काही तरी
अस्तित्व तुझे आधार हा वाटतो सोबती

उन पिवळे पान कोवळे रान सारे कोवळे
एकच एक रंग इथे हिरवा दिसतो भोवती

असून जरी दोलायमान फांदी वाऱ्यावरी
वाजवीत शिळ सहजपणे डौलतो शेवटी

खेळतात सावल्या कवडसे एकमेकांसवे
वाटते तुही बागडावे मुक्त म्हणतो संगती

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९