फार फरक पडतो ...

Started by राजेश शेषराव पोफारे, November 28, 2022, 11:03:52 PM

Previous topic - Next topic
फार फरक पडतो आयुष्यात कुणी नसल्याने ,अचानक आयुष्यात कुणी घुसल्याने ..
फार फरक पडतो....

कधीतरी चुकून प्रेमात पडल्याने ,
एकाच वेळी दोघींचाही कॉल आल्याने ..
फार फरक पडतो ....

समुद्रासारखा खारेपणा माझ्यात होता
तरीही त्या गोड नदीने मला मिठी मारल्याने ..फार फरक पडतो ....

कधी महबूब होतो रे तिचा मी ,
वर्षभरात मामा झाल्याने...
फार फरक पडतो ....आणि शेवटी तिला एवढच बोललो की ,( प्रेमाच सोड ना आपण पुन्हा मैत्रीच करू ,
अडकलेल्या या जिवाला जरा मोकळे करू ,
त्या अर्धवट फरवरी ला विसरून जा तू
आपण मैत्रीचे अधिक महिने साजरे करू.))

समुद्रमंथनातून मिळालेल्या अमृतासारखा वाटायचा तो चहा ,
जेव्हा मित्रांसोबत एकात दोन करून प्यायचो ,
पण हल्ली no sharing no caring no comparing
हे ही चहात आल्याने ...
फार फरक पडतो ....

सगळे ऋतू एक करून, सगळी तयारी केली असते ,
वावर ,घरदार सगळ सोडून ,मुख्य परीक्षा ही दिली असते ,,
मी टॉप ला आहे हे दाखवणारी लिस्ट ही लागली असते ,,
मग फक्त तो एक कॉल न आल्याने
फार फरक पडतो ....

हाफ पँट घालून शाळेत जायच्या वयात
जर बापाला गमावलं तर पुढे काय होते ,
हे त्याने कधी जाणवूच दिल नाही ,
'दादा' तू ग्रेट आहे रे ,पण एक सांगू बाप नसल्याने ...
फार फरक पडतो ..

पाहिल्यासारखं कुणी कुणाला विश करत नाही ,
त्यांच्या insta,fb,wp ला तुमचं स्टेटस ही लावत नाही ,
कारण त्याच्या सोबत तुमचा एक जॉईन फोटो नसल्याने ...
फार फरक पडतो ....

लग्नाचा जोडीदार चुकल्याने ,
आणि लिहायचे खूप असते ,
पण विषय न सुचल्याने ...
फार फरक पडतो ....

______________________
   राजेश शेषराव पोफारे
सेंदरी त. देवळी जि.वर्धा..
    मो.9307010387