मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-138

Started by Atul Kaviraje, December 03, 2022, 09:41:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               मला आवडलेल्या चारोळ्या
                                 चारोळी क्रमांक-138
                              -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      --नवं-चारोळीकार  अगदी   बखुबीनें  गतकाळातील  त्या  आठवणींच्या  आठवणी  या  चारोळीतून  आपणास  सांगत  आहे . तो  म्हणतोय , वर्तमानकाळ  जुना  झाला  की  साहजिकच  त्याचा  भूतकाळ  होतो . या  काळातील  घटना  मग  आठवणीतच  उरतात . त्या  कधी  सुखद-गोड  असतात , तर  कधी  कडूही . मग  एका  निवांत  वेळी  डोळे  मिटून  बसले  असता , हलकेच  त्या  गत-काळातील  आठवणींना  उजाळा  मिळतो , त्या  एकामागोमाग  येत  आठवत  राहतात . त्यातील  कटू-गोड , सुखद-दुःखद , नकोश्या-हव्याश्या  आठवणी  साऱ्याच  मग  आठवू  लागतात . गोड  आठवणींपेक्षा  कटू  अनुभवांच्या  आठवणीच  जरा  जास्त  आठवू  लागतात . आणि  अश्या  वेळी  पापण्या  नकळत  भिजतात, ओलावतात  . कितीही  आवरले  मनास  तरी , त्या  डोळ्यांवाटे  अश्रू-रूपात  बाहेर  पडू  पाहतात . त्या  थांबवता  येत  नाहीत . परंतु  अश्या  वेळी  एकाच  गोष्ट  करणे  अगदी  सहज  शक्य  असते , ती  म्हणजे  मनाला  भेदून  जाणाऱ्या , वेदना , दुःख  देणाऱ्या  या  आठवांना  आठवूनही  गालातल्या  गालात  मंद  हसायला  शिकायचं  असतं . पापण्यातले  पाणी  अडवता  अडवता , ते  दिसू  न  देता  थोडंसं  हसायलाही  शिकायचं  असतं . हेच  तर  जीवन  असतं .

==================
आठवणींतल्या आठवणींना
हळुच आठवायचं असतं.
डोळे पाणावलेले असले तरी
मंद गालातल्या गालात हसायचं असतं.
==================

नवं-चारोळीकार
--------------

             (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझ्या लेखणीतून.ब्लॉगस्पॉट.कॉम)
            -------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.12.2022-शनिवार.