संपली होती आपली कहाणी साक्षीला उरले केवळ डोळ्यांत पाणी

Started by तुतेश रिंगे ✍️, December 04, 2022, 02:12:24 AM

Previous topic - Next topic

तुतेश रिंगे ✍️

संपली होती आपली कहाणी
साक्षीला उरले केवळ डोळ्यांत पाणी

पाऊस ही होतो तो ही धो धो कोसळत होता
कदाचित तुला माझ्या मनाची स्थिती सांगत होता

शर्ट जरी काळे मी घातले
तरी मनात तुझ्या संशयाचे काळे बीज पेरले

त्यातून उगवलेल्या झाडाची सावली आपल्या नात्यावर पडली
आपली प्रेम कहाणी तिथेच बसस्टॉप वर संपली

छत्री एकच होती तीही तुझ्यापाशी
एक संधी होती आपल्यापाशी

तु तर निघुन गेलीस
मला तर तिथे चिंब चिंब भिजवत होता पाऊस
:- तुतेश रिंगे ✍️
__________________________________
Follow me on instagram
shabd_mazya_manatale__