तिच्या हाती ना कोणते अस्त्र ना कोणते शस्त्र तिचे सौंदर्य हेच तिचे ब्रह्मास्त्र

Started by तुतेश रिंगे ✍️, December 04, 2022, 02:16:25 AM

Previous topic - Next topic

तुतेश रिंगे ✍️

तिच्या हाती ना कोणते अस्त्र ना कोणते शस्त्र
तिचे सौंदर्य हेच तिचे ब्रह्मास्त्र

केसात मोगरा माळूनी करते ती हृदयावर वार
हवेवर उडणाऱ्या साडीच्या पदराला आहे तिच्या धार

मादक नजरेचा करते ती मारा
घायाळ होतो जो कोणी तिच्या समोर येणारा

ओठांवर तिच्या लाली
हसताना गालावर पडते तिच्या खळी

शब्दांत तिच्या मोहनी
हास्यात तिच्या वसे सौदामिनी

मौनाच्या भाषेतून फुलवीत हुंकार आली
समोरच्याला चितपट करायला करुनी सोळा शृंगार आली
:- तुतेश रिंगे ✍️
__________________________________
Follow me on instagram
shabd_mazya_manatale__