मदहोश अशी चांदरात आहे

Started by तुतेश रिंगे ✍️, December 04, 2022, 02:18:34 AM

Previous topic - Next topic

तुतेश रिंगे ✍️

मदहोश अशी चांदरात आहे
खिडकी बाहेर बरसात आहे

रातराणी ही गात आहे
सुंदर ही आपली मिलनाची रात आहे

अश्या ह्या राती मिठीत तुला घेता माझा लव लव शहारून जातो
तुझ्या मिठीत क्षण हा मोहरुन जातो

तुझ्या गरम श्वासांत माझे श्वास मला जाणवत आहेत
मिठीत तुझ्या मी स्वतःला विसरत आहे

डोळे तुझे लाजेने चुर आहेत
अश्या ह्या रात्री आपल्यात अजुनही अंतर आहे

प्रिये मिटवून आपल्यातील अंतर प्रीत जागवू अंतरी
शरीरात वाहू दे आज प्रणयाच्या बेधुंद लहरी
:- तुतेश रिंगे ✍️
__________________________________
Follow me on instagram
shabd_mazya_manatale__