०४-डिसेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, December 04, 2022, 09:06:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०४.१२.२०२२-रविवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                     "०४-डिसेंबर-दिनविशेष"
                                    ----------------------

-: दिनविशेष :-
०४ डिसेंबर
भारतीय नौदल दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९७
संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार' प्रदान
१९९३
उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा 'तानसेन सन्मान' जाहीर
१९९१
पॅन अ‍ॅम
Boeing 747-121(A-SF)
पॅन अ‍ॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. १४ मार्च १९२७ रोजी या कंपनीची स्थापना होऊन १९ ऑक्टोबर १९२७ रोजी तिच्या कामकाजास सुरुवात झाली होती.
१९७५
सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९७१
भारतीय नौदलाने कराचीतील पाकिस्तानी नौदलावर हल्ला केला (Operation Trident). या हल्ल्यात पी. एन. एस. खैबर या बलाढ्य युद्धनौकेसह चार पाकिस्तानी नौका आणि शेकडो सैनिकांना जलसमाधी मिळाली. या कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबर हा दिवस 'भारतीय नौदल दिन' म्हणून साजरा केला जातो.
१९४८
भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली. त्यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.
१९६७
थुंबा येथील तळावरुन 'रोहिणी' या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण
१९२४
गेटवे ऑफ इंडिया
मुंबईतील 'गेटवे ऑफ इंडिया'चे उद्‍घाटन झाले. ३१ मार्च १९१३ रोजी या वास्तूच्या बांधमाकास सुरुवात झाली होती.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९३५
शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक
(मृत्यू: २० जुलै १९९५)
१९१९
इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान
(मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१२)
१९१६
बळवंत गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, पंजाब विद्यापीठातील भारतीय रंगभूमी विभागाचे प्रमुख, 'थिएटर ऑफ इंडिया' आणि 'फोक थिएटर ऑफ इंडिया' या पुस्तकांचे लेखक
(मृत्यू: २२ एप्रिल २००३ - मुंबई)
१९१०
आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती, केन्द्रीय मंत्री, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी
(मृत्यू: २७ जानेवारी २००९)
१९१०
मोतीलाल राजवंश ऊर्फ 'मोतीलाल' – आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते
(मृत्यू: १७ जून १९६५)
१८३५
सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक
(मृत्यू: १८ जून १९०२)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२०१९
बॉब विलीस
बॉब विलीस – इंग्लिश जलदगती गोलंदाज
(जन्म: ३० मे १९४९)
२०१७
बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा 'शशी कपूर' – अभिनेता
(जन्म: १८ मार्च १९३८)
१९७४
कवी गिरीश
शंकर केशव कानेटकर ऊर्फ 'कवी गिरीश'
(जन्म: २८ आक्टोबर १८९३ - फत्यापूर, सातारा)
११३१
ओमर खय्याम – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी
(जन्म: १८ मे १०४८)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.12.2022-रविवार.