मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-140

Started by Atul Kaviraje, December 05, 2022, 09:17:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                मला आवडलेल्या चारोळ्या
                                  चारोळी क्रमांक-140
                               -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकार  चारोळ्या , कविता  लिहीतानाचे  अनुभव  आपणापुढे  उघड  करीत  आहे . तो  म्हणतोय , कविता  म्हणा  किंवा  चारोळ्या  म्हणा , लिहिण्यास  जास्त  श्रम  पडत  नाहीत . त्या  तर  कुणीही  लिहू  शकतो . फक्त  हातात  लेखणी  घेऊन  आणि  कागद  पुढे  सरसावून   बसत , आपल्याला  आलेले  अनुभव , आपल्या  मनात  दडलेल्या  भावना , आणि  बरंच  काही  हे  सारं  कागदावर  उतरवून  काढायचं . फार  श्रम  नाही  पडत , फक्त  तुम्ही  त्या  मनापासून  लिहायच्या  मात्र . माझ्या  कविता  अन  चारोळ्याही  अश्याच  आहेत . अन  उदाहरण  देता  चारोळीकार  पुढे  म्हणतोय , जसं  पहाटेस  पानांवर ,पात्यांवर  पडलेले  दव  हे  खाली  न  पडता , तिथेच  साठून  राहत , तसंच  काहीस  माझ्या  कवितांचं ,चारोळीचं  आहे . माझ्या  मनाच्या , अंतर-मनाच्या  पात्यावर  माझ्याच  गत-काळातील  मला  आलेले  अनुभव  किंवा  त्या  आठवणींचे  साठलेले ते  दव-बिंदूच  जणू ,जे उत्स्फूर्तपणे  केव्हातरी  मग  मनातून  बाहेर  येऊ  पाहतात , अन  कागदावर  उतरू  पाहतात .

================
माझ्या कविता-चारोळ्या म्हणजे,
माझ्या भावना, माझे अनुभव.
माझ्या मनाच्या पात्यावर साठलेले,
माझ्याच आठवणींचे दव.
================

नवं-चारोळीकार
--------------

             (साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझ्या लेखणीतून.ब्लॉगस्पॉट.कॉम)
            -------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.12.2022-सोमवार.