मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-53-माझा आवडता प्राणी बैल

Started by Atul Kaviraje, December 05, 2022, 09:31:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-53
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता प्राणी बैल"

     मित्रानो आपल्या देशात खूप साऱ्या प्राण्यांच्या जाती पाहायला मिळतात. व बरेच पाळीव प्राणी पाळले हि जातात, पण बैलाला शेतकऱ्याचा मित्र म्हणून संबोधले जाते.

     आजच्या या लेखात मी तुम्हाला माझा आवडता प्राणी बैल या विषयावर निबंध मराठीत देत आहे. हा निबंध तुम्ही आपला शाळेचा होमवर्क म्हणून देखील वापरू शकता, तर करा सुरुवात..

     आपल्या देशात लोक अनेक पाळीव प्राणी पाळता. कुत्रा, मांजर या सारखे प्राणी जास्त करून श्रीमंत लोक आपली हौस म्हणून पाळतात. पण गरीब शेतकऱ्याला गाई व बैलच पाळावे लागतात. कारण गाई म्हशी शेतकऱ्याला दूध देतात आणि बैल शेताच्या कामी येतो. बैल हा सर्वात जास्त प्रमाणात कष्ट करणारा प्राणी आहे. बैल हा शेतकऱ्याचा मित्रच असतो. मला बैल खूप आवडतो आमच्या घरी सुद्धा 1 बैल जोडी आहे.

     बैल खूपच कष्टाळू असतो. त्याचे लांब व मजबूत पायंच्या मदतीने तो शेत नांगरण्यात खूप मदत करतो. बैलाचे शरीर पण खूप मजबूत असते. बऱ्याचदा शेतकरी त्याच्या अंगावर समान वाहतो. यासाठी बैलाला बैलगाडी ला बांधले जाते. बैल हा पूर्णपणे शाकाहारी असतो तो फक्त हिरवा चारा खातो. मासाहर न करता ही बैल इतर सर्व प्राण्याच्या तुलनेत अधिक कष्ट करण्याची क्षमता ठेवतो.

     भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बैलाच्या प्रजाती पाहायला मिळून जातात. भारता ऐवजी विदेशात देखील बैल पाळले जातात. आपल्या महाराष्ट्रात बैल पोळ्याच्या दिवशी बैलाला सजवले जाते. हा दिवस बैलांचे आभार मानण्यासाठी असतो. वर्षभरातुन एकदा या दिवशी बैलाला आराम दिला जातो, पुराण पोळी सारखे स्वादिष्ट व्यंजन बनून त्यांला खाऊ घातले जातात.

     खरोखर बैल हाच शेतकऱ्याचा खरा मित्र असतो. तो आपल्या मालकाच्या भावना बरोबर ओळखतो. या मुळेच मला बैल खूपच प्रिय आहे व माझा आवडता प्राणी बैल आहे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.12.2022-सोमवार.