मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-29-गाडगीळ समीती अहवाल-ब-

Started by Atul Kaviraje, December 06, 2022, 09:10:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-29
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "गाडगीळ समीती अहवाल"

                             गाडगीळ समीती अहवाल--ब--
                            --------------------------

     महाराष्ट्र सोडून बाकी पाच राज्यात या अहवाला कडाडून विरोध झाला. केरळ मध्ये तर "चर्च" या संस्थांनी अहवाला आक्षेप घेत प्रा. गाडगीळ यांच्या वर देश विरोधी असल्याची कडवट टीका केली.

     गाडगीळ स्वत: व पर्यावणाचे दुकानदार यांनी अर्थातच "गाडगीळ समितीचा" अहवाल म्हणजे जणू देव-वाणी व या अहवाला विरोध करणारे सर्व पर्यावरण विरोधी, किंवा "आर्थिक हितसंबंध" असणारे, असा गलका सुरु केला व दुर्दैवाने महाराष्ट्रतील वर्तमानपत्रांनी याला भरपूर प्रसिद्धी दिली.

     कस्तुरीरंगन कार्यगटाने या अहवालातील सूचनांना खूपच dilute केले आहे, कोयना वीज प्रकल्प बंद करून कोयना धरण मोडीत काढा, तसेच मुळशी पासून केरळ मधील मुलपेरीयार पर्यंत सर्व धरणे पण मोडीत काढा, असल्या "मौलिक" सूचनांना बाद केले आहे. दोन्ही अहवाल केन्द्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वेबसाईट वर आहेत, शंका असल्यास स्वत: वाचून खात्री करून घ्यावी.

     मात्र, केन्द्रीय पर्यावरण मंत्रालय आता काय करणार हे अजून नक्की नाही. पर्यावरणवाद्यांनी दबाव वाढवायला सुरवात केली आहे. आपल्या देशात काय होते कि नकारवादी त्यांचेच ते खरे करून घेण्या करता कार्यरत असतात. त्या करता PIL तंत्राचा भरपूर वापर केला जातो. या सगळ्या करता पैसा कुठून येतो हे एक कोणालाही न उकललेले गूढ आहे. सकारात्मक जनता मात्र या सगळ्या पासून Aloof असते. "गाडगीळ समितीच्या" सूचनां प्रमाणे कोयना वीज प्रकल्प बंद करून कोयना धरण मोडीत काढा या करता PIL दाखल होण्याची शक्यता खूप आहे. पण महाराष्ट्राच्या विकासात कोयना वीज प्रकल्प महत्वाचा आहे व तो बंद करू नये व कोयना धरण मोडीत काढू नये या करता कोणीच PIL दाखल करण्याची शक्यता नाही. म्हणून नकारवाद्यांचा नेहमीच वरचष्मा असतो.

     तेंव्हा, कस्तुरीरंगन कार्यगटाच्या अहवाला नंतर मुळशी, पानशेत, वरसगाव, भाटघर, कोयना, इत्यादी धरणे सुरक्षित आहेत असे अजिबात गृहीत धरू नये. "जागे राहा, रात्र वैर्याची आहे".

--चेतन पन्डित
(May 3, 2013)
----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.12.2022-मंगळवार.