दत्त-जयंती-कविता-गीत दत्ताचे मुखी आळवितो

Started by Atul Kaviraje, December 07, 2022, 08:57:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.१२.२०२२-बुधवार आहे. आज श्री दत्त-गुरूंची जयंती आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-कवयित्रीस "दत्त-जयंती" च्या हार्दिक शुभेच्छा. दत्त गुरूंचे नांव घेत आणि मंत्रघोष करीत कविता वाचूया. या कवितेचे शीर्षक आहे- "गीत दत्ताचे मुखी आळवितो"

                              "गीत दत्ताचे मुखी आळवितो"
                            ---------------------------

जयंती निमित्ते तुझिया दत्ता
तुझ्या गाणगापुरी मी येतो
भक्तिभावे, सश्रद्ध नमुनी चरणांचे,
पावन तीर्थामृत मी प्राशीतो.

तीन शिरे, सहा हात
त्रिमूर्ती तुझी मी नयनी साठवितो
ब्रह्मा-विष्णू-शिवाचे रूप तुझे,
डोळा भरुनी मी पाहतो.

एकवीस गुरूंचा तू परम-शिष्य
तुझा महिमाच अगाध असतो
मी पामर तुजपुढे काहीच नाही,
तुझ्या अस्तित्त्वापुढे नतमस्तक होतो.

आणखी काय मागणे देवा दत्ता
तव दर्शनाची नित्य आस बाळगतो
परतुनी जाता माघारी घरा,
हृदयी फक्त तुलाच आळवितो.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.12.2022-बुधवार.