मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-55-माझा आवडता प्राणी मांजर

Started by Atul Kaviraje, December 07, 2022, 09:28:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                   निबंध क्रमांक-55
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता प्राणी मांजर"

     मित्रानो आपल्या देशात खूप साऱ्या प्राण्यांच्या जाती पाहायला मिळतात व बरेच पाळीव प्राणी पाळले जातात, पण मांजरी सर्वात गोंडस प्राणी म्हणून संबोधले जाते. आजच्या या लेखात मी तुम्हाला माझा आवडता प्राणी मांजर निबंध भाषण (Maza Avadta Prani Manjar) या विषयावर निबंध मराठीत देत आहे. हा निबंध तुम्ही आपला शाळेचा होमवर्क म्हणून देखील वापरू शकता, तर करा सुरुवात..

     माझा आवडता प्राणी मांजर. मांजर एक घरगुती प्राणी आहे ती खूपच सुंदर आणि गोंडस असते. मांजरांच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या जाती असतात. काही मांजरी काळ्या असतात तर काही पांढर्याशुभ्र. मांजरीची त्वचा पण वेगवेगळी असते. काही मांजरांचे केस लांब असतात तर काहींचे लहान असतात. मांजरीचे पूर्ण शरीर केसांनी झाकलेले असते.

     मांजर दिसण्यात लहान वाघासारखी असते. खरे पाहता ती वाघांच्या प्रजातीची सदस्य आहे. तिला वाघाची मावशी पण म्हटले जाते. मांजरीला उंदर खायला खूप आवडतात. तिला दूध प्यायला पण आवडते. मांजर मांसाहारी आणि शाकाहारी दोघी प्रकारचे अन्न खाते. तसं तर मांजर ही हिंसक नसते, पण कधीकधी ती घरातील सदस्यांना नुकसान पोहचवू शकते म्हणून मांजरी पासून सावधान राहायला हवे.

     मांजरीचे डोळे चमकदार असतात, तिचे डोळे भुरे किंवा हिरव्या रंगाचे असतात. मांजरीचे डोळे रात्रीच्या अंधारात चमकतात. त्यामुळे मांजर कमी उजेडात किंवा रात्रीच्या वेळी पण दिसून जाते. रस्त्याने चालताना जर मांजर आडवी गेली तर लोक याला अशुभ मानतात. पण हा एक अंधविश्वास आहे. मांजरीला कुत्र्यापासून खूप भय वाटते कारण कुत्रे मांजरीला खाऊ शकतात.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.12.2022-बुधवार.