II श्री साई बाबा प्रसन्न II-साई भक्ती कविता-साई-बाबांची धुनी पेटतच आहे

Started by Atul Kaviraje, December 08, 2022, 09:04:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II श्री साई बाबा प्रसन्न II
                                 -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज गुरुवार. श्री साई-बाबांचा वार. आज ऐकुया, श्री साईंची एक भक्ती कविता. या भक्ती कवितेचे बोल आहेत-  "साई-बाबांची धुनी पेटतच आहे"

                                  श्री साई भक्ती कविता
                             "साई-बाबांची धुनी पेटतच आहे"
                            -----------------------------

साई-बाबांची धुनी पेटतच आहे
माझ्या बाबांची धुनी धगधगतच आहे
साई क्षेत्र शिरडी पवित्र, पुण्यवान,
बाबांच्या कर्मभूमीची आठवण सांगत आहे.

अग्नी केला प्रज्वलित चिमटा आपटूनी
साईंची कहाणी भरलीय नाना चमत्कारांनी
त्यामधूनी हा चमत्कार टिकून आहे आजही,
साई-बाबांची धुनी पेटतच आहे.

राम-रहिमचा ईश्वर-अल्लाह तूच
सर्वांना एका नजरेने पाहणारा तूच
तुझ्या हृदयात साऱ्यांसाठी करुणा आहे,
तुझा आशीर्वाद सर्वांसाठी एकच आहे.

कुणा एके काळी शिरडीस प्रगटलास तू
दया-करुणेने सर्वांना आपलंस  केलंस तू
श्रद्धा-सबुरीचा चिरंतन मंत्र दिलास तू,
तुझा आजही शिर्डित वास आहे.

अवलिया, फकीर तुज गेले संबोधले
जात-पात न पाहता सर्वांचेच केलंस तू भले
एकापाठोपाठ चमत्कार तू दाखविले,
भक्तांनी तुज देवत्त्व बहाल केले.

सोज्वळ तव रूप मनास मोहित करते
तुझी प्रेमळ नजर साऱ्यांकडेच असते
अशी तुझी मूर्ती भक्तांना आकर्षित करते,
शिरडी गाव भक्तांनी भरून, गजबजून जाते. 

धुनीचा तुझा चमत्कार आजही आहे चर्चित
भक्ता पाडतो भुरळ, पाहण्या बोलावितो शिर्डित
उद-राख धुनीची, मनोभावे लावावी कपाळी,
तिचं रक्षील आम्हा सदा-सर्वदा संकटकाळी.

तुझी निरंतर पेटती धुनी भक्तांनी राखली आहे
तुझ्या अस्तित्त्वाचा हा एका दैवी पुरावा आहे
साई-बाबांची धुनी पेटतच आहे,
माझ्या बाबांची धुनी धगधगतच आहे.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.12.2022-गुरुवार.