मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-57-माझा आवडता प्राणी ससा

Started by Atul Kaviraje, December 09, 2022, 09:09:18 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               "मला आवडलेला निबंध"
                                  निबंध क्रमांक-57
                              ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता प्राणी ससा"

     जगभरातील लोकांद्वारे वेगवेगळे पाळीव प्राणी पाळले जातात. माझा आवडता प्राणी ससा आहे, आम्ही आमच्या फार्म मध्ये ससे पाळले आहेत. ससा हा खूपच सुंदर दिसतो, त्याचा स्वभाव चंचल असतो व तो दिवसभर इकडून तिकडे उड्या मारीत असतो. लहान मुलांना तर ससे खूपच आवडतात. जगभरात सशांच्या जवळपास 305 प्रजाती आढळतात. अंटार्टिका ला सोडून हा प्राणी प्रत्येक खंडात आढळतो. दक्षिण अमेरिकेमध्ये सशाच्या सर्वात जास्त प्रजाती आहेत.

     सशाचे स्नायू खूपच लवचिक असतात, यामुळे तो लांब उड्या मारू शकतो. सशाच्या पायातील नखे खूपच मजबूत व धारदार असतात. या नखांच्या मदतीने तो जमिनीत बिळ करतो. साश्याचा आकार मांजरी सारखा लहान असतो. याचे पूर्ण शरीर लहान केसांनी झाकलेले असते. या केसामुळे थंडीच्या ऋतूत त्याचे रक्षण होते. ससे हे भुरे, काळे आणि पांढऱ्या रंगाचे असतात. सशाचे कान व नाक खूप तेज असतात. सशाला एक लहान शेट्टी पण असते. सशाच्या तोंडात 28 दात असतात, या दाताच्या मदतीने ते आपल्या भोजनाला कुरतडून खातात.

     ससे हे जास्त करून इतर सश्यासोबत राहणे पसंद करतात. सशांच्या जास्त करून प्रजाती जंगलात आढळतात. ससे हे जमिनीच्या खाली खड्डे करून राहणे पसंद करतात. ससा शाकाहारी प्राणी आहे. तो जास्त करून हिरवे गवत, फळे, गाजर, मुळा खाणे पसंद करतो. सशांच्या जीवन काल आठ ते दहा वर्षांचा असतो.

     ससा हा अतिशय गोंडस प्राणी आहे. बरेच मांसाहारी लोक सशांना मारून खातात. असे करणे योग्य नाही खाण्यासाठी दुसरे चांगले चांगले पदार्थ पण आहेत. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की ससे व अन्य पाळीव प्राण्यांचे रक्षण आपण करायला हवे. मला ससा हा खूप आवडतो व माझा आवडता प्राणी ससा आहे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.12.2022-शुक्रवार.