मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-33-2014 ...पंतप्रधान पद आणि भाजप

Started by Atul Kaviraje, December 10, 2022, 09:32:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला लेख"
                                    लेख क्रमांक-33
                               ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "2014 ...पंतप्रधान पद आणि भाजप"

                          2014 ...पंतप्रधान पद आणि भाजप--
                         --------------------------------

     आजच्या घडीला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे अतिशय योग्य उमेदवार आहेत ,हे 1000% सत्य आहे.परंतु काहीवेळा सत्य आणि परिस्थितीनुरूप वास्तव यात फरक असतो. आज शिवसेनेने पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यापूर्वि एनडीए च्या सर्व घटकपक्षांना विश्वासात घ्या असे आवाहन केले आहे. भाजपचे पक्ष पातळी वरील विस्कळीत संघटन आणि सुसूत्रतेचा अभाव , कर्नाटकातील खेळखंडोबा आणि मोदींच्या नावाला असलेला नितीशकुमारचा विरोध यासारख्या बाबी विचारात घेता 2014 च्या निवडणुकीत नक्की काय होईल,याबाबत शंकेची पाल चुकचुकते. त्यातच कॉंग्रेस नितीशकुमारचा वापर प्यादया प्रमाणे करून तिसर्या आघाडीचे पिल्लू काढील ,आणि बाहेरून पाठिंबा देवून आपले नेहमीचे त्रिशंकु राजकारण खेळू पाहिल ,यात संशय नाही.

     यास्तव निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी भाजपने कुशलतापूर्वक व्यूहरचना करून पक्षपातळीवरील गोंधळ निस्तारणे गरजेचे आहे. आधीच मोदींचे नाव पुढे केल्याने इतर इच्छुकांच्या गोटात नाराजी /अस्वस्थता असू शकते. यास्तव माझ्या मते सुषमा स्वराज यांचे नाव प्रधानमंत्री पदासाठी निश्चित केल्यास बरेच प्रश्न सुटतील.मोदी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते देवून मोदींच्या सल्ल्यानुसार त्यांच्या गुजरात मॉडेल वर आधारित राज्यकारभार केल्यास मोदीप्रेमींना जे अपेक्षित आहे,तसा भारत घडू शकतो. त्याचप्रमाणे भविष्यकाळात विरोध मावळल्यास मोदी प्रधानमंत्री बनू शकतात .पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मतांच्या आणि सीट्स च्या बेरजेच्या राजकरणात बाजी मारण्यासाठी सुषमा स्वराज उपयोगी पडू शकतील , कारण त्यांच्या नावावर सर्वमान्यता होण्याची जास्त शक्यता वाटते .

--मंदार कात्रे
(25 एप्रिल 2013)
-----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.12.2022-शनिवार.