शंकर महादेवन-चिंब भिजलेले रूप सजलेले

Started by Atul Kaviraje, December 10, 2022, 09:34:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, श्री शंकर महादेवन यांनी गायिलेले एक गीत. या गीताचे शीर्षक आहे- "चिंब भिजलेले रूप सजलेले"

                             "चिंब भिजलेले रूप सजलेले"
                             -------------------------

ह्या रिमझिम झिरमिळ पाऊस धारा,
तन मन फुलूवून जाती
ह्या रिमझिम झिरमिळ पाऊस धारा,
तन मन फुलूवून जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा,
रंग सुखाचा हाती
हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले , स्वच्छंद प्रीतीचे
चिंब भिजलेले , रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे

ओढ जागे राजसा रे, अंतरी सुख बोले
सप्तरंगी पाखरू हे, इंद्रधनू बनू आले
लाट हि , वादळी , मोहुनी गाते
हि मिठी लाडकी भोवरा होते.
पडसाद भावनांचे , रे बंध ना कुणाचे
दाही दिशांत गाणे, बेधुंद प्रीतीचे
चिंब भिजलेले , रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे

घेऊन ओले पंख आले रूप हे सुखाचे
रोम रोमी जागले दीप बघ स्वप्नाचे
बरसतो मोगरा थेंब गंधाचे
भरजरी वेल हे ताल छंदांचे
घन व्याकूळ रिमझिमणारा
मन अंतर दरवळणारा
हि स्वर्ग सुखाची दारे,
हे गीत प्रीतीचे
चिंब भिजलेले , रूप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे

===========
गीत : प्रविण दवणे
स्वर : शंकर महादेवन
संगीत : अजय अतुल
===========

--प्रकाशक : शंतनू देव
--------------------

                 (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                          (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
                -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.12.2022-शनिवार.