मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-59-माझा आवडता प्राणी हत्ती

Started by Atul Kaviraje, December 11, 2022, 09:25:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                   निबंध क्रमांक-59
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता प्राणी हत्ती"

     मित्रानो जगभरात वेगवेगळे प्राणी व प्राण्याच्या जाती पाहायला मिळतात. यातील काही प्राणी अतिशय लहान तर काही विशालकाय आहेत. बऱ्याच प्राण्यांना पाळले देखील जाते व हे प्राणी मनुष्याच्या पण खूप कामात येतात. आज आपण अश्याच एका प्राण्याबद्दल निबंध पाहणार आहोत या प्राण्याचे नाव आहे हत्ती. हा हत्तीवर मराठी निबंध (Elephant marathi essay) आपण आपल्या शाळा कॉलेज मध्ये वापरू शकतात. याला तुम्ही माझा आवडता प्राणी हत्ती म्हणून देखील लिहू शकतात. तर चला मग करा सुरुवात.

     आपल्या पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्राणी जाती पाहायला मिळतात. पण आजच्या काळात पृथ्वीवर जिवंत असलेल्या प्राण्यांमध्ये सर्वात मोठा व शक्तिशाली प्राणी हत्ती आहे. हत्ती हा जंगलात राहतो, परंतु त्याला प्राणिसंग्रालय तसेच योग्य प्रशिक्षण देऊन माणसांसोबत पण ठेवले जाते. हत्ती फार पूर्वीपासून मनुष्यासाठी उपयुक्त आहे. मी सुद्धा बऱ्याचदा हत्तीची स्वारी केली आहे. माझा आवडता प्राणी हत्ती आहे. हत्ती ची ताकत आणि शरीर रचना मला खूप आवडते.

     जास्तकरून हत्तीचा रंग भुरा असतो. हत्तीचे चारही पाय खाब्याप्रमाने मजबूत असतात. इतर प्राण्याचे तुलनेत हत्तीला एक अवयव विशेष असतो आणि तो अवयव आहे त्याचे नाक. हत्तीला एक मोठी सोंड असते जीच्याने तो श्वास घेतो. या सोंडेच्या आजूबाजूला मोठे मोठे दोन दात असतात. हत्तीचे दोन कान मोठं मोठाल्या पंख्या प्रमाणे असतात. पण त्याचे डोळे शरीराच्या तुलनेत लहान असतात. मागे एक शेपटी पण असते.

     हत्ती हा जास्तकरून जंगलात राहतो व तो पूर्णपणे शाकाहारी असतो. हत्ती लहान फांद्या, झाडाची पाने, भुसा आणि जंगली फळे खातात. पाळीव हत्ती हे पोळी, ऊस, केळे अश्या गोष्टी पण खातात. आज कल लोक जड सामान वाहने, सर्कस मध्ये काम करणे इत्यादी गोष्टी साठी हत्तीला वापरतात. प्राचीन काळात हत्ती राजा महाराजा द्वारे युद्धासाठी वापरले जायचे. हत्तीचे आयुष्य भरपूर असते. एक स्वस्थ आणि निरोगी हत्ती 100 वर्षांपर्यंत जगू शकतो. जिवंतपणी ज्याप्रमाणे हत्ती उपयोगी असतो, मृत्यू नंतर पण त्याचे अनेक उपयोग असतात. मेल्यानंतर हत्तीचे दात व शरीरावरील इतर अवयव वेग वेगळे औषधी आणि सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी उपयुक्त असतात.

     आजच्या काळात भरपूर हत्तींना पाळीव प्राणी म्हणून वापरले जात आहे. परंतु जंगली हत्ती पकडणे फार कठीण कार्य आहे. हत्ती हा जरी शांत स्वभावाचा असला तरी त्याला त्रास दिल्यावर तो खूप खतरनाक होऊन जातो.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.12.2022-रविवार.