II ओम नमः शिवाय II-चारोळी

Started by Atul Kaviraje, December 12, 2022, 02:38:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II ओम नमः शिवाय II
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१२.१२.२०२२-सोमवार. भोळ्या शंकराचा दिवस. हर हर महादेव म्हणत, शिव-लिंगाची पूजा करण्याचा पावन दिवस. जय शिव शंकर, ओम नमः शिवाय मंत्र-घोष करत श्री शंकराला पुजण्याचा दिवस. हा दिवस विसरून कसं बरं चालेल ! सुस्नात होऊन पहाटे-पहाटे शिव-मंदिरात जाऊन शिव-पिंडीस दुधाचा अभिषेक करून, बेल-पत्री वाहून, मनो-वांछित मागणे मागावे. तो भोळा सांब नक्कीच प्रसन्न होईल. तुमच्या सर्व इच्छा-कामना तो नक्कीच पूर्ण करील. फक्त तुम्ही त्याला मनापासून शरण जा. माझे त्या परम-शक्ती कडे एवढंच मागणे आहे, कि हे शिवा, मी तुझा आज जो उपवास धरला आहे, तो तुला प्रसन्न करण्यास नव्हे बरं का ! मला काहीही नकोय. फक्त तुझी एक प्रेमळ दृष्टी हवीय. मला मनापासून असं वाटतंय, की माझ्या भक्ती-भावास प्रसन्न होऊन तू नित्य माझ्या घरी यावंसं. माझ्या घरी तू कायमचाच वास कर. म्हणजे, मला तुझे नित्य दर्शन घडेल. त्यासाठी तुझ्या राउळी-देउळीं येण्याची मला गरज पडणार नाही. माझ्या हृदयात तू वसला आहेसच. माझ्या घराचे मंदिर व्हावे हीच माझी एक इच्छा आहे.

===================
शंकरा, आज आहे तुझा दिवस
धरितो मी तुझा उपवास
मज काही नको, मागणे एवढंच,
माझ्या गृह-मंदिरी तुझा नित्य असो वास.
===================

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-१२.१२.२०२२-सोमवार.