मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-60-माझा आवडता प्राणी हत्ती

Started by Atul Kaviraje, December 12, 2022, 09:11:51 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-60
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता प्राणी हत्ती"

     हत्ती हा चपळ, आज्ञाकारी व पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी आहे. हत्ती हा प्राणी आफ्रिका आणि आशिया खंडात सापडतो. जास्त करून हत्तीचा रंग भुरा असतो. पण थायलंडमध्ये पांढऱ्या रंगाचे हत्ती देखील आढळतात. हत्ती हे जास्त करून समूहात राहतात. हत्ती हे 100 वर्षापेक्षा अधिक आयुष्य जगतात.

     हत्ती हे जास्त करून जंगलात राहतात. पण त्यांना प्राणीसंग्रहालय आणि सर्कस मध्ये देखील ठेवले जाते. हत्तीची उंची 11 फूट पर्यंत असू शकते. त्याचे वजन दोन हजार पासून ते सहा हजार किलोपर्यंत असते. हत्तीचे कान खूप उंच असतात, ते 5 मैल पर्यंतचे आवज ऐकू शकतात. त्याचे चारही पाय पण खूप मजबूत असतात. त्याला नाकाऐवजी श्वास घ्यायला एक लवचिक सोंड असते. हत्तीच्या या अश्या रूपा लहान मुलांना हत्ती खूप आवडतो.

     पृथ्वीवर हत्तीचे दोन प्रकार आढळतात. आफ्रिकी व एशियन. आफ्रिकन हत्तीचा आकार एशियन हत्ती पेक्षा मोठा असतो. हत्ती हे शाकाहारी असल्या कारणाने, ते अन्नाच्या आवश्यकते साठी जंगल व झाड झुडपा वर अवलंबून असतात.

     वाढती लोकसंख्या व जंगल तोड मुळे हत्तींना अन्न व राहण्यासाठी जागेची कमतरता भासत आहे. यामुळे बऱ्याचदा हत्ती जंगला जवळील गावामध्ये घुसून येतात. हत्ती हा शांत आणि बुद्धिमान प्राणी आहे व यासोबतच मनुष्या ‍साठी पण तो खूप उपयुक्त आहे. पण आजकाल हत्तीचे महागडे दात व शरीरावरील इतर महत्वाचे अवयव काढण्यासाठी अवैधपणे हत्तीची हत्या केली जात आहे, असे करणे योग्य नाही सरकार ने या घटना रोखण्यासाठी कठीण कायदे पण केले आहे. पण सर्व नागरिकांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी जंगली पशुचे रक्षण करायला हवे व जर कोणी पशुहत्या करीत असेल तर त्याला रोखायला हवे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.12.2022-सोमवार.