पं.जितेंद्र अभिषेकी-शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले

Started by Atul Kaviraje, December 13, 2022, 09:10:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, पं. जितेंद्र अभिषेकी यांनी गायिलेले एक गीत. या गीताचे शीर्षक आहे- "शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले"

                        "शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले"
                       ----------------------------------------

शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले

अर्थ नवा गीतास मिळाला
छंद नवा अन्‌ ताल निराळा
त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले ?
...... घडू नये ते घडले ... शब्दांच्या पलिकडले

होय म्हणालिस नकोनकोतुन
तूच व्यक्त झालीस स्वरातुन
नसता कारण व्याकुळ होऊन उगिच हृदय धडधडले
...... घडू नये ते घडले ... शब्दांच्या पलिकडले

आठवते पुनवेच्या रात्री
लक्ष दीप विरघळले गात्री
मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले
...... घडू नये ते घडले ... शब्दांच्या पलिकडले

============
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर -पं.जितेंद्र अभिषेकी
============

--प्रकाशक : शंतनू देव
(MONDAY, MARCH 14, 2011)
--------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                            (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
                -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.12.2022-मंगळवार.