मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-63-माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध

Started by Atul Kaviraje, December 15, 2022, 09:08:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                     निबंध क्रमांक-63
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध"

     मित्रानो आपल्या देशात वेगवेगळे खेळ खेळले जातात. पण आजच्या या निबंधाचा विषय आहे माझा आवडता खेळ क्रिकेट (Cricket Nibandh Marathi). या निबंधाला तुम्ही आपल्या शाळेचा होमवर्क म्हणून वापरू शकतात. तर चला मग सुरू करू....

     खेळ कोणताही असो त्यात मनोरंजना सोबत शरीराचा व्यायाम पण होऊन जातो. खेळामुळे शरीर मजबूत बनते. आपल्या देशात वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळले जातात. जसे हॉकी, टेबल टेनिस, फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, बुद्धिबळ इत्यादी. क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ सर्व प्रथम इंग्रजांद्वारे भारतात आला होता. आणि तेव्हा पासून तर आज पर्यंत या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीच्या काळात क्रिकेट फक्त राजा महराजांद्वारे खेळला जायचा. परंतु स्वातंत्र्यानंतर या खेळाला सर्वजण खेळायला लागले. 

     क्रिकेटचे सामने दोन तऱ्हेचे असतात. एक दिवसीय सामना व पाच दिवसीय सामना. एक दिवसीय सामन्यात दोघी टीम ठरलेल्या ओव्हर खेळतात आणि मॅच चा निर्णय पण त्याच दिवशी कळून जातो. पाच दिवसीय मॅच लांब चालते. यात ओव्हर ची संख्या अनिश्चित असते आणि खेळाडू दररोज संध्याकाळ होई पर्यन्त असे पाच दिवसापर्यंत खेळतात. क्रिकेट चे सामने दोन संघामध्ये होतात. दोन्ही संघामध्ये 11-11 खेळाडू असतात. क्रिकेट मध्ये दोन अंपायर असतात, अंपायर टॉस करणे तसेच निर्णय देण्याचे काम करतात. क्रिकेट खेळण्यासाठी मैदान साफ असायला हवे. क्रिकेट भारत, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड इत्यादी देशात लोकप्रिय आहे. हा खेळ गरीब, श्रीमंत, नेता, अभिनेता, विद्यार्थी, कर्मचारी सर्वानाच आवडतो.

     क्रिकेट खेळण्यासाठी चेंडू आणि बॅट आवश्यक असतात. क्रिकेटची मॅच दोघी टीम मध्ये टॉस ने सुरू होते. मॅच च्या ओव्हर ठरलेल्या असतात. प्रत्येक ओव्हर मध्ये 6 बॉल असतात. बॉल टाकण्याचे पण नियम असतात. जर बॉल व्हाईट किंवा बाउन्सर गेला तर त्या बॉल ला नो बॉल घोषित करून, बॅटिंग करणाऱ्या टीम ला अतिरिक्त रन दिले जातात. बॅटिंग करणाऱ्या संघाचे दोन खेळाडू पिच वर थांबतात. व बॉलिंग टाकणाऱ्या संघाचे खेळाडू संपूर्ण मैदानात चारही बाजूनां उभे राहतात. नंतर बॉलिंग करणाऱ्या संघातून एक खेळाडू  बॉल समोर बॅट्समन च्या दिशेला फेकतो. बॅटिंग करणारा खेळाडू बॅट ने बॉल ला मारून चौकार किंवा षटकार मारतो. अश्या पद्धतीने रन एक एक करून दोघी टीम बॅटिंग आणि बॉलिंग करतात. व शेवटी ज्याचे रन जास्त तो संघ जिंकतो.

     भारतीय क्रिकेट संघात खूप चांगले चांगले खेळाडू खेळले आहेत. पण आजही सचिन तेंडुलकर ला क्रिकेट चे भगवान म्हणून ओळखले जाते. क्रिकेट प्रेमी साठी सचिन तेंडुलकर हे आवडते खेळाडू आहेत. इत्यादी अनेक कारणांमुळे मला सुद्धा क्रिकेट हा खेळ खूपच आवडतो.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.12.2022-गुरुवार.