मला आवडलेल्या चारोळ्या-चारोळी क्रमांक-151

Started by Atul Kaviraje, December 16, 2022, 08:45:07 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                मला आवडलेल्या चारोळ्या
                                   चारोळी क्रमांक-151
                               ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     --नवं-चारोळीकार  त्या  बालपणीच्या  मैत्रीशी , आपल्या  मित्रांशी  कसं  प्रामाणिक , एकनिष्ठ  राहायचं  असतं  हे  या  चारोळीतून   कथित  करीत  आहे . तो  म्हणतोय , मैत्री  अशी  असावी , इतकी  दृढ  असावी , इतकी  घट्ट  असावी , की  कोणत्याही  परिस्थितीत  ही  मैत्री  तुटता  कामा  नये . मित्रांनी  नेहमीच  एकमेकांशी  प्रामाणिक  असावे . या  मैत्रीबद्दल  कोणीही  कितीही दुस्वास  केला , कोणी  कितीही  बोललं , काहीही  बोललं  तरीही  आपली  ही  मैत्री  घट्ट  पकडून  ठेवायची . मैत्रीत  विघ्न  आणणाऱ्या  या  विघ्न-संतोषी  लोकांच्या  बोलण्याला  भुलायचं  नाही , त्यांचे  काहीच  न  ऐकता  आपले  मैत्रीचे  नाते  हे  दृढ  ठेवायचे . आणि  जर  एखादी  गोष्ट  लपवायची  असेल , काहीतरी  चूक  आपल्या  किंवा  आपल्या  मित्राच्या  हातून  घडली , आणि  जेणेकरून  आपण  पकडलो  गेलो , किंवा  आपले  नांव  कुणा  समजले  गेले , तरी  आपण  होऊन  त्यांच्या  स्वाधीन  व्हायचे . आपल्या  मित्रांची  नावे  कधीही  उघड  करायची  नाहीत . त्या  मित्रांशी  नेहमीच  प्रामाणिक  राहायचे . प्रसंगी  स्वतः  शिक्षा  भोगायची , पण  आपल्या  मित्रास  मात्र सुखरूप  ठेवायचे .

==============
कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही.
==============

नवं-चारोळीकार
--------------

        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मन माझे.ब्लॉगस्पॉट.कॉम .ब्लॉगस्पॉट.कॉम)
       ----------------------------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.12.2022-शुक्रवार.