मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-64-क्रिकेट खेळाबद्दल महत्वाची माहिती

Started by Atul Kaviraje, December 16, 2022, 08:58:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-64
                                ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "क्रिकेट खेळाबद्दल महत्वाची माहिती"

--क्रिकेट हा मोकळ्या मैदानात खेळला जाणारा एक खेळ आहे. या खेळाला खेळण्यासाठी बॅट आणि बॉल चा वापर केला जातो. क्रिकेट भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे.
--क्रिकेटची मॅच मोकळ्या मैदानात खेळली जाते. याला खेळण्यासाठी आयताकृती मैदान आवश्यक असते.
--क्रिकेटमध्ये दोन संघ असतात, या दोन्ही संघात 11-11 खेळाडूंचा समावेश असतो. --प्रत्येक संघाला बॅटिंग बॉलिंग करण्याची संधी मिळते.
--क्रिकेटची मॅच सुरू होण्याआधी अंपायर टॉस करतो. व टॉस जिंकणारा संघ बॅटिंग करावी की बॉलींग हे ठरवतो.
--बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दोन खेळाडूंना खेळण्यासाठी मैदानात प्रवेश दिला जातो. बॅटिंग करणारा संघ जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करतो. तर बॉलिग करणारा संघ जास्तीत जास्त विकेट घेण्याचा प्रयत्न करतो.
--क्रिकेट सामन्यात दोन अंपायर असतात. अंपायर द्वारे देण्यात आलेला निर्णय प्रत्येक संघाला मान्य करावा लागतो.
--क्रिकेट ची सुरुवात सोळाव्या शतकात इंग्लंड मध्ये झाली होती.
--भारतात क्रिकेट अतिशय प्रसिद्ध झालेला खेळ आहे. अनेक मुले गल्ली, रस्त्यावर क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.12.2022-शुक्रवार.