बाजार ???

Started by Ashok_rokade24, December 18, 2022, 06:49:47 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

असत्याचा बाजार इथे , 
सत्याला काही मोल नसे ,
वर्चस्वाचा संग्राम सुरू ,
नितीमत्तेचे भान नसे  ॥

संस्कार, रूढींच्या वाल्गना ,
पाप,पुण्य साऱ्या कल्पना ,
ऊजेडातील सोंगे ढोंगे ,
अंधारी काहीच न दिसे ॥

कुणी सत्ते साठी भांडतो ,
मस्तीत हा कुणी रमतो ,
सत्य इथे गुलाम झाले ,
माणुसकीला थारा नसे ॥

कुणी पताका ऊंच धरी ,
कुणी रंगाचे स्तोम करी ,
घेणे देणे नसे कुणाशी ,
टाळूवरचे लोणी दिसे ॥

बाजार नको असत्याचा ,
असत्य  नाशवंत आहे ,
प्रसंग जरी असो बाका ,
सत्य हेच शाश्वत असे ॥

अशोक मु.रोकडे .
मुंबई .