मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-66-माझा आवडता खेळ फुटबॉल

Started by Atul Kaviraje, December 18, 2022, 09:26:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-66
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता खेळ फुटबॉल"

     खेळणे मुलांना खूपच आवडते. आमच्या शाळेत देखील वेगवेगळे खेळ खेळले जातात. क्रिकेट हा त्यातील सर्वात जास्त खेळला जाणारा खेळ आहे. खेळणे चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.  आमच्या वर्गातील अधिकाधिक मुले क्रिकेट खेळतात पण माझा आवडता खेळ फुटबॉल आहे. मला फुटबॉल खेळायला तर आवडतेच पण फुटबॉल च्या मॅचेस बघायला पण खूप आनंद वाटतो.

     फुटबॉल चा खेळ मोकळ्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन्ही बाजूंना गोल पोस्ट असतो. हा खेळ दोन संघामध्ये खेळला जातो. खेळात 9-9 किंवा 11-11 खेळाडू असतात. फुटबॉल हा खेळ 90 मिनिटाचा असतो. प्रत्येक संघाला विरोधी पक्षाच्या गोल पोस्ट मध्ये बॉल टाकून जास्तीत जास्त गोल करायचे असतात. या खेळला खेळणारे व पाहणारे दोघेही आनंद घेतात. हा खेळ तेव्हा जास्त रोमाचक वाटायला लागतो, जेव्हा कोणत्याही एका टीम मधील खेळाडू बॉल घेऊन दुसर्या टीम चे पोस्ट मध्ये गोल करायला जात असतो. फुटबॉल खेळल्याने शरीराच्या सर्व अवयवांना व्यायाम मिळतो. शरीरात स्फूर्ती वाढते. सहयोग आणि शिस्तीची भावना पण वाढते. कोलकत्यात तर हा खेळ अधिकच लोकप्रिय आहे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.12.2022-रविवार.