मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-68-माझा आवडता खेळ बॅडमिंटन

Started by Atul Kaviraje, December 20, 2022, 09:22:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                   निबंध क्रमांक-68
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता खेळ बॅडमिंटन"

     बॅडमिंटन हा इंनडोर म्हणजेच बंद खोलीत खेळला जाणारा खेळ आहे या खेळाला खेळण्यासाठी एक रॅकेट आणि शटल कॉक ची आवश्यकता असते. या खेळाला बंद खोलीत खेळले जाण्यामागे कारण असे आहे की यात जे शटल कॉक वापरले जाते ते वजनाने खूप हलके असते व बाहेरच्या हवेमुळे त्याची दिशा बदलू शकते. बॅडमिंटन हा माझा आवडता खेळ आहे. मला हा खेळ आवडण्यामागे एक कारण असेही आहे की या खेळाला खेळण्यासाठी जास्त लोकांची आवश्यकता नसते. फक्त दोन लोक सुद्धा याला खेळू शकतात.

     या खेळामध्ये खेळाडू रॅकेट म्हणजेच बॅट हातात धरतात व शटल कॉक म्हणजेच बॅडमिंटनमधील फुल ला त्या रॅकेट ने इकडून तिकडे मारतात. बॅडमिंटन मधील फुल अतिशय कमी वजनाचे असते त्याचे वजन 100 ग्रॅम पर्यंत असू शकते. या खेळात जास्त नियम राहत नाहीत म्हणून कोणीही याला खेळू शकतो.  बॅडमिंटन खेळण्यासाठीचे मैदान दोन भागात विभागले जाते. मैदानाच्या मधोमध एक जाळी लावली जाते.

     भारतात बॅडमिंटन हा क्रिकेट नंतर दुसरा सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. बॅडमिंटन खेळाची सुरुवात इंग्लंडमधून झाली आहे. वर्तमानात पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, पी. गोपीचंद, श्रीकांत किडांबी, पी कश्यप हे भारताचे प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू आहेत. या खेळाडूंनी भारतासाठी अनेक मेडल्स जिंकलेले आहेत. या खेळाला मुले व मुली दोघी खेळू शकतो व यामध्ये दुखापत होण्याची शक्यता पण खूप कमी असते.

     बॅडमिंटन खेळताना लागते इकडून तिकडे पळत राहावे लागते. ज्यामुळे शरीराचा व्यायाम होतो, शरीर तंदुरुस्त राहते. बॅडमिंटन खेळला नाही शरीरातील रक्तस्त्राव व्यवस्थित हो लोक प्रतिरोधक क्षमता वाढते. बॅडमिंटन आपल्या शरीर व मनाला नवीन ऊर्जा प्रदान करतो. म्हणून सर्वांनी दररोज थोडा वेळ काढून बॅडमिंटन खेळायला हवे.

--लेखक-मोहित पाटील
--------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.12.2022-मंगळवार.