मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-43-भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 1/3)-ब-

Started by Atul Kaviraje, December 20, 2022, 09:33:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-43
                                ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 1/3)"

                   भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 1/3)--ब--
                  -------------------------------------------   

                   स्मार्ट व्हीलचेअर

     या व्हीलचेअरच्या सीटसाठी कार्बन फायबर वापरल्यामुळे सीटच आघात शोषकप्रमाणे (shock absorber) काम करू शकते. वेग नियंत्रणासाठी भक्कम ड्रम ब्रेक्सची सोय यात केलेली आहे. इतर व्हीलचेअरमध्ये वेल्डिंगने जोडणी केल्यामुळे व्हीलचेअरची घडीचे डिझाइन शक्य नव्हते. परंतु स्पिंडलचे नट - बोल्टचे डिझाइन असल्यामुळे घडी करून कारमध्ये ठेवणे सुलभ ठरले आहे. सीटच्या पाठीमागील shock absorberमुळे सीट मागे पुढे करत आरामशीर बसणे शक्य झाले आहे. चाकांच्या टायरची जाडी जास्त ठेवल्यामुळे कच्या रस्त्यावर चेअर सुलभपणे जाऊ शकते. चेअरची रुंदी 870 mm पासून 710 mm करता येत असल्यामुळे लहान दरवाज्यातून जाणे शक्य झाले आहे.

     अशा प्रकारचे व्हीलचेअर्स जागतिक बाजारात आलेले असून आपल्या येथेही त्या येण्याची शक्यता आहे.

                         ब्लेडलेस फॅन

     2009 साली बाजारात आलेल्या डायसन एअर मल्टिप्लायर फॅन्समध्ये नेहमीच्या ब्लेड्सच्या जागी बांगडीसारखे दिसणारे एक जाड चाक आहे. व चाकाच्या खालच्या गोल तळभागात मोटर ठेवण्याची सोय केलेली आहे. हा एक टेबल फॅन आहे. सर् जेम्स डायसन यांची मुळात व्हक्यूम क्लीनिंगची साधनं बनविणारी कंपनी आहे. वाऱ्याचा झोत वापरून धूळ, कचरा साफ करणाऱ्या क्लीनर्सवरून ब्लेडलेस फॅनची कल्पना त्यांना सुचली. व त्याचे पेटंटही त्यानी घेतले आहे.

     या फॅनच्या स्ट्यँडमध्येच ब्रशलेस मोटर ठेवलेला आहे. मोटर फिरताना एरोफॉइल आकाराच्या फटीतून वारा बाहेर फेकला जातो. एका सेकंदाला 405 लिटर वारा बाहेर फेकण्याची क्षमता या फॅनमध्ये आहे. मोटरच्या चलनातून बाहेर पडणाऱ्या वाऱ्याच्या 15 पट वारा सर्क्युलेशनसाठी उपलब्ध होऊ शकतो.

     डायसनच्या कंपनीतील फ्ल्युइड डायनॅमिक्स इंजिनियर्सनी या फॅन्स च्या वेगवेगळ्या घटकांचे डिझाइन केले आहे. हेल्मेट्स व कार बंपर्ससाठी वापरात असलेल्या विशिष्ट प्रकारच्या दणकट (acrylontride butadiene styrene) थर्मोप्लास्टिक पासून स्ट्यँडची बॉडी तयार केली आहे. मोटारीच्या वेग नियंत्रणासाठी डिमर स्विचचा वापर केला आहे. वाऱ्याची झोत कमी - जास्त वा वर - खाली - बाजूला करण्याची सोय यात आहे. वापरण्यास सुलभ, फिरणारे ब्लेड्स नसल्यामुळे अधिक सुरक्षित अशी ही यंत्रणा आहे.

     जपानच्या एका कंपनीनीसुद्धा अशाच प्रकारच्या फॅनसाठी त्या देशाचे पेटंट घेतले आहे. परंतु डायसनत्या फॅनमध्ये एरोडायनॅमिक्स तत्वाचा योग्य प्रकारे वापर केल्यामुळे हा फॅन बाजारात सरस ठरत आहे.

--प्रभाकर नानावटी
(April 8, 2013)
-----------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                   ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.12.2022-मंगळवार.