२१-डिसेंबर-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, December 21, 2022, 09:05:08 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.१२.२०२२-बुधवार. जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "२१-डिसेंबर-दिनविशेष"
                                  ----------------------

-: दिनविशेष :-
२१ डिसेंबर
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९८६
रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९६५
दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.
१९१३
ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.
१९०९
अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.
१९०५
स्वातंत्र्यवीर सावरकर बी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९६३
गोविंदा – हिन्दी चित्रपट कलाकार
१९५९
कृष्णम्माचारी श्रीकांत – धडाडीचे आघाडीचे फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे अध्यक्ष
१९५९
फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू (मृत्य़ू: २१ सप्टेंबर १९९८)
१९५४
ख्रिस एव्हर्ट लॉइड – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
१९४२
हू जिंताओ – चीनचे राष्ट्राध्यक्ष
१९२१
पी. एन. भगवती – भारताचे १७ वे सरन्यायाधीश
१९१८
कुर्त वाल्ढहाईम – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस
(मृत्य़ू: १४ जून २००७)
१९०३
भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट. (पुणे विद्यापीठ), उद्योजक
(मृत्य़ू: २ नोव्हेंबर १९९०)
१८०४
बेंजामिन डिझरेली – इंग्लंडचे पंतप्रधान
(मृत्य़ू: १९ एप्रिल १८८१)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९९७
निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ 'पी. सावळाराम' – भावगीतलेखक. कुसुमाग्रज यांनी त्यांना 'जनकवी' ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
(जन्म: ४ जुलै १९१४)
१९९७
पं. प्रभाशंकर गायकवाड – सनईवादक
(जन्म: ? ? ????)
१९९३
मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार
(जन्म: ? ? ????)
१९७९
नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक
(जन्म: १५ एप्रिल १८९३)
१९६३
सर जॅक हॉब्ज
सर जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू
(जन्म: १६ डिसेंबर १८८२)
१८२४
जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ
(जन्म: ११ एप्रिल १७५५)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.12.2022-बुधवार.