मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-69-माझा आवडता खेळ खो खो

Started by Atul Kaviraje, December 21, 2022, 09:24:13 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "मला आवडलेला निबंध"
                                    निबंध क्रमांक-69
                               ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता खेळ खो खो"

मित्रानो आपल्या देशात वेगवेगळे खेळ खेळले जातात. पण आजच्या या निबंधाचा विषय आहे माझा आवडता खेळ खो खो निबंध मराठी (kho kho marathi nibandh). या निबंधाला तुम्ही आपल्या शाळेचा होमवर्क म्हणून वापरू शकतात. तर चला मग सुरू करू....

     आपल्या देशात विविध परंपरागत खेळ खेळले जातात. आपल्या देशातील या परंपरागत खेळांना खेळण्यासाठी कोणत्याही साहित्याची गरज नसते. म्हणून श्रीमंतांपासून ते गरिबापर्यंत कोणीही या खेळांना खेळू शकतो.

     आजकल कॉम्प्युटर व मोबाईल च्या युगात खेळाचे महत्त्व कमी होत आहे. आता अधिकांश मुले मोबाईल मध्येच गेम खेळत राहतात. जास्त वेळ बसून मोबाईल वापरल्याने शरीराची वाढ थाबून जाते, आणि स्नायू कमजोर राहून जातात. आपल्या देशात हॉकी, कब्बडी, खोखो ई. परंपरागत खेळ खेळले जातात. यात माझा आवडता खेळ खो खो आहे.

     खो खो खेळल्याने माझे पूर्ण शरीर तंदुरुस्त राहते आणि सोबतच विचार करण्याची क्षमता देखील वाढते. या खेळाला खेळल्याने मी एकग्रतेने अभ्यास करतो. खो खो खेळल्याने शरीरात रक्तस्त्राव जोरात होतो आणि माझे शरीर स्वस्थ राहते. खोखो ला खेळण्यासाठी 51 फूट रुंद आणि 111 फूट लांब मैदानाची आवश्यकता असते. मैदानाच्या दोघी बाजूंना 10 फूट जागा सोडून 4 फूट लांब खांब गाडले जातात. या खेळाला खेळण्यासाठी दोन संघाची आवश्यकता असते. ज्यात प्रत्येक संघात 9 खेळाडू आणि 8 अतिरिक्त खेळाडू असतात. हे 8 अतिरिक्त खेळाडू या साठी असतात कारणं जर खेळताना कोण्या खेळाडूला दुखापत झाली तर त्याच्या जागी या मधून एकाला टीम मध्ये पाठवले जाते.

     प्रत्येक संघाला खेळण्यासाठी 7 मिनिटे दिली जातात. प्रत्येक संघातून एक एक खेळाडू ला उभे केले जाते. बसलेली टीम ला दुसऱ्या टीम च्या खेळाडूला पकडायचे असते. जेव्हा पकडणारा दुसऱ्या टीम च्या खेळाडू च्या जवळ पोहोचतो तेव्हा आपल्या टीम च्या बसलेल्या खेळाडूला हात लाऊन खो म्हणतो आणि त्याच्या जागी तो बसून जातो व ज्या खेळाडूला खो म्हटले तो उठून दुसऱ्या टीम च्या खेळाडूला पकडतो. हीच प्रक्रिया विरोधी टीम पण करते.

     खो खो खेळण्यासाठी तंदुरुस्ती आणि स्फूर्तीची आवश्यकता असते. या खेळाला खेळल्याने शरीरातील रोग प्रतिरोधक क्षमता वाढून शरीराचा विकास होतो. मी रोज माझ्या मित्रासोबत खो खो खेळतो मला खोखो हा खेळ खूपच आवडतो.

--लेखक-मोहित पाटील
---------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                 -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.12.2022-बुधवार.