मला आवडलेला लेख-लेख क्रमांक-44- संशोधन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आवाहन-

Started by Atul Kaviraje, December 21, 2022, 09:33:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "मला आवडलेला लेख"
                                     लेख क्रमांक-44
                                 ---------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला लेख" या शीर्षकI-अंतर्गत, एक महत्त्वाचा, अभ्यासपूर्ण आणि ज्ञानवर्धक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "संशोधन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आवाहन"

                    संशोधन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आवाहन--
                   ------------------------------------------
   
     पर्यावरण साक्षरता व उपभोक्त्यांचे वर्तन' या विषयावरील संशोधनात सहभागी होण्यासाठी काही स्वयंसेवकांची गरज आहे. स्वयंसेवक हे अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाचे व संगणक साक्षर असावेत. सदर स्वयंसेवकांना एक प्रश्नावलीचा दुवा पाठवण्यात येईल. त्या दुव्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी भरायची आहेत. सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरुपाचे आहेत. कोणतीही खाजगी माहिती, अगदी स्वयंसेवकाचे नावही, देणे बंधनकारक नाही. सदर माहिती गोपनीय ठेवली जाईल व तिचा फक्त संशोधनासाठीच वापर करण्यात येईल.

     ही प्रश्नावली थोडी मोठी (व मोठ्या कष्टाने तयार केलेली ) आहे. ज्यांना संशोधन या विषयात रस आहे त्यांना या संशोधनाचे निष्कर्ष व्यक्तिगत निरोपातून कळवण्यात येतील. 'उपक्रम' च्या वाचकांना मी सदर संशोधनात भाग घेण्याचे आवाहन करतो आहे. ज्यांना या प्रकल्पात भाग घ्यावासा वाटतो, त्यांनी कृपया त्यांचा ई-मेल पत्ता मला व्यक्तिगत निरोपातून पाठवावा. सदर संशोधन माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. जितके अधिक स्वयंसेवक यात भाग घेतील, तितकी या संशोधनाची व्यापकता वाढेल. कृपया या 'उपक्रमा'त सहभागी होऊन या संशोधनाला हातभार लावावा.

--सन्जोप राव
(April 6, 2013)
-----------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-mr.उपक्रम.ऑर्ग)
                    ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.12.2022-बुधवार.