कुठंतरी, काहीतरी चुकतंय...

Started by Jai dait, August 24, 2010, 02:04:34 PM

Previous topic - Next topic

Jai dait

मन सारखं हुरहुरतंय
सगळं काही ठीक असलं
तरी मनाला वाटतंय
कुठंतरी, काहीतरी चुकतंय...

जुन्याच जखमा नकोत पुन्हा
नको तुझ्या आठवणींचा गुन्हा
जपल्या ज्या वेदना आजवर
त्यानींच मनात आता दुखतंय
कुठंतरी, काहीतरी चुकतंय...

हातून माझ्या निसटून गेले
क्षण दोघांचे मी टिपलेले
कायमच हे होत राहिलं
हाती येता-येता ते हुकतंय
कुठंतरी, काहीतरी चुकतंय...

                     --जय

PRASAD NADKARNI