सुरेश वाडकर-जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा

Started by Atul Kaviraje, December 22, 2022, 09:46:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, श्री सुरेश वाडकर यांनी गायिलेले एक गीत. या गीताचे शीर्षक आहे- "जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा"

                          "जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा"
                         -----------------------------------

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

आभाळ भाळ होते, होती बटा ही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना
ही वेल चांदण्यांची, ओठांवरी झुकेना
देशील का कधी तू थोडा तरी इशारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

नशिबास हा फुलांचा का सांग वास येतो
हासून पाहिल्याचा नुसताच भास होतो
केव्हा तुझ्या खुषीचा उगवेल सांग तारा
माझा न राहतो मी हरवून हा किनारा

============
गीत : मंगेश पाडगावकर
संगीत : श्रीनिवास खळे
गायक : सुरेश वाडकर
============

--प्रकाशक : शंतनू देव
--------------------

                 (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                           (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
                -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.12.2022-गुरुवार.