पं.हृदयनाथ मंगेशकर-लाजून हासणे अन्‌ हासून ते पहाणे

Started by Atul Kaviraje, December 23, 2022, 10:31:59 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी गायिलेले एक गीत. या गीताचे शीर्षक आहे-   "लाजून हासणे अन्‌ हासून ते पहाणे"

                          "लाजून हासणे अन्‌ हासून ते पहाणे"
                         --------------------------------

लाजून हासणे अन्‌ हासून ते पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा ?
मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा ?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ?
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे !
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा
देशातुनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

===============
गीत : मंगेश पाडगावकर
गायक :पं. हृदयनाथ मंगेशकर
संगीत : हृदयनाथ मंगेशकर
===============

--प्रकाशक : शंतनू देव
(SATURDAY, MARCH 12, 2011)
----------------------------------

                 (साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                            (संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
                -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.12.2022-शुक्रवार.