मला आवडलेला निबंध-निबंध क्रमांक-72-माझा आवडता खेळ कबड्डी

Started by Atul Kaviraje, December 24, 2022, 09:18:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               "मला आवडलेला निबंध"
                                   निबंध क्रमांक-72
                              ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज वाचूया, "मला आवडलेला निबंध", या निबंध-मालिकेतील एक महत्त्वाचा निबंध. या निबंधाचे शीर्षक आहे- "माझा आवडता खेळ कबड्डी"

     आपल्या देशात अनेक खेळ खेळले जातात. पण माझा आवडता खेळ कबड्डी आहे. कबड्डी हा अतिशय स्वस्त, सोपा आणि आरोग्यवर्धक खेळ आहे. कबड्डी खेळायला कोणत्याही प्रकारचे सामान आवश्यक नसते. काही वर्षाआधी कबड्डी फक्त पंजाब मध्ये खेळला जायचा पण आताच्या काळात भारतासह नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका इत्यादी देशात खेळला जातो. कबड्डीला भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. हा खेळ जवळपास चार हजार वर्ष जुना आहे. कबड्डीच्या उल्लेख महाभारतात पण केला गेला आहे. कबड्डी खेळण्यासाठी ताकत आणि समजदारी आवश्यक असतात.

     कबड्डीचे खेळ दोन संघामध्ये खेळले जातात. प्रत्येक संघात 7-7 सदस्य असतात. कबड्डीच्या मैदानाचे माप जवळपास 13 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद असते. या मैदानाला मध्यभागी रेष मारून दोन भागात वाटले जाते. मैदानात प्रवेश केल्यानंतर टॉस केली जाते. टॉस जिंकणाऱ्या टीम ला दुसऱ्या टीमच्या भागात जाऊन खेळाडूंना हात लावून बाद करायचे असते. जर खेळाडू दुसऱ्या टीमच्या भागात जाऊन कोणत्याही खेळाडूला हात लाऊन येऊन गेला तर त्याला एक अंक मिळतो. आणि ज्या खेळाडूला हात लावला आहे त्या खेळाडूला काही वेळासाठी मैदानाच्या बाहेर जावे लागते. जर दुसऱ्या टीमच्या खेळाडूंनी हात लावून बाद करणाऱ्या या टीमच्या खेळाडूला पकडून घेतले, तर त्यांना अंक प्राप्त होतात आणि या टीमच्या खेळाडू ला बाहेर जावे लागते.

     आज कबड्डी बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ आहे. कबड्डीला आता आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सामील केले आहे, ज्यामुळे कबड्डी अधिकच लोकप्रिय होत आहे. आजकल महिला देखील कबड्डी खेळत आहेत. कबड्डी खेळ स्फूर्ती आणि शक्तीचा खेळ आहे. म्हणून सर्वांनी कबड्डी खेळायला हवे.

--लेखक-मोहित पाटील
---------------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-भाषण मराठी.कॉम)
                  -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.12.2022-शनिवार.