आनंदी नाताळ-ख्रिसमस-1

Started by Atul Kaviraje, December 25, 2022, 11:51:08 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 आनंदी "नाताळ-ख्रिसमस"
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज २५.१२.२०२२, रविवार, नाताळचा पावन दिवस आहे. जोसेफ आणि मेरी यांचा सुपुत्र, देवाचा प्रेषित प्रभू येशू याचा जन्म दिवस. मराठी कवितेच्या माझ्या सर्व ख्रिस्ती भाऊ-बहिणींना, "नाताळ-ख्रिसमस"-च्या हार्दिक शुभेच्छा. चला तर ऐकुया नाताळाच्या शुभेच्छा चारोळ्या-

--स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..
Merry Christmas!

--नाताळ सण घेऊन आला आनंद मनामनात,
मागूया साऱ्या चुकांची माफी याच दिनात..
सर्वांना सुखी कर ही कामना ठेवूया..
एकत्र येऊन प्रभू येशूचे गाणे गाऊया..
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

--ख्रिसमस हा सण आहे प्रेम देण्याचा आणि आयुष्यातील छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं कौतुक करण्याचा. तुझं यश आणि तुझ्यातील चांगल्या गोष्टी पुढच्या वर्षी अशाच कायम राहो. मेरी ख्रिसमस.

--ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना या सुट्ट्या छान घालवता येवोत आणि नववर्षही छान जाओ. मेरी ख्रिसमस.

--आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.

--स्मिता हळदणकर
------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी पिक्चर्स.कॉम)
                   --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.12.2022-रविवार.